आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललिता ठरल्या बेंगळुरू तुरुंगाच्या कैदी क्रमांक 7402, जेवणात मिळाला सांबर, भात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : बेंगळुरूच्या जेलमध्ये तयार करण्यात आलेल्या अस्थायी कोर्टात सुनावणीसाठी जाताना एआयडीएमके प्रमुख जयललिता.

बेंगळुरू - तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांना 18 वर्षे जुन्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षे कारावास आणि 100 कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना बेंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद करण्यात आले आहे. जयललिता या ठिकाणी कैदी क्रमांक 7402 आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी सुविधा पुरवण्यात आलेली नाही.

शनिवारी रात्री जयललिता यांना सामान्य कैद्यांप्रमाणेच जेवण पुरवण्यात आले. त्यात भात आणि सांबर होते. गुन्हेगारी प्रकरणात समावेश असणा-या सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार दोषी ठरल्यानंतर खुर्ची गमावणा-या जयललिता या पहिल्या मुख्यमंत्री आहेत.

भात आणि सांबर
जयललिता यांना मध्यवर्ती कारागृहात महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या एका सेलमध्ये बंद करण्याआधी त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात आले. त्यांना तुरुंगात 7402 हा कैदी क्रमांक देण्यात आला. विशेष म्हणजे हाय सेक्टुरिटी असणा-या बेंगळुरू सेंट्रल जेलमध्ये एकही व्हीव्हीआयपी सेल नाही. जया यांना ज्याठिकाणी कैद करण्यात आले आहे, त्याचठिकाणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांना एका जमीन घोटाळा प्रकरणी शिक्षा मिळाल्यानंतर 24 दिवस या तुरुंगात ठेवण्यात आले होते. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार जयललिता यांना जेवणात भात, सांबर, दही आणि लोणचे देण्यात आले.


कडक सुरक्षा व्यवस्था
जयललितांसाठी सेंट्रल जेलच्या महिला विंगमध्ये एक खास सेल तयार करण्यात आला आहे. येथे त्यांच्या सुरक्षेचीही खास काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी खास सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. जयललितांना यांना झेड सुरक्षा होती. त्यामुळे सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे. बेंगळुरू पोलिसांनी जेलच्या पाच किलोमीटर परिसरात कलम 144 लागू केले आहे.
अधिका-यांनी जयललितांची मागणी फेटाळली
शिक्षा सुनावल्यानंतर जयललिता यांनी चक्कर आल्याची आणि प्रकृती खराब झाल्याची तक्रार केली होती. तसेच तपासणीसाठी खासगी रुग्णालयात नेण्याची मागणीही त्यांनी केली होती. पण अधिका-यांनी अत्यंत कडक भूमिका घेत त्यांची ही मागणी फेटाळली. त्यांना शिक्षा सुनावण्यात आली असल्यामुळे नियमाप्रमाणे त्यांची तुरुंगातच तपासणी केली जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. डॉक्टरांना त्यांना इतरत्र नेण्याची गरज भासल्यास तसा निर्णय घेण्यात येईल असेही अधिका-यांनी स्पष्ट केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जयललिता यांच्या संतप्त समर्थकांची छायाचित्रे...