चेन्नई - उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्या प्रकरणी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) प्रमुख आणि
जे. जयललिता तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे विश्वासू आणि पक्षाचे
ज्येष्ठ नेते पनीरसेल्व्हम यांची तामिळनाडुचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) प्रमुख एम. करुणानिधी आणि त्यांचा मुलगा एम.के.स्टॅलिन यांच्याविरोधात तीन एफआयआर दाखल झाले आहे. एआयएडीएमके समर्थकांनी डीएमके समर्थकांसोबत शनिवारी झालेल्या झटापटीनंतर त्याबद्दलची तक्रार दिली होती. रविवारी देखील एआयएडीएमके समर्थकांनी
जयललिता यांच्या शिक्षेविरोधात आंदोलन केले. समर्थकांनी त्यांना भेटण्याचा अग्रह तुरुंग प्रशासनाकडे धरला आहे. एआयएडीएमकेच्या काही नेत्यांनी तुरुंगात जयललिता यांची भेट घेतली आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. पन्नीरसेल्व्हम यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदी कोण असणार हे ठरविण्यासाठी नेत्यांनी त्यांना तुरुंगात भेटण्यासाठी गर्दी केली होती.
(
जयललिता ठरल्या बेंगळुरू तुरुंगाच्या कैदी क्रमांक 7402, जेवणात मिळाला सांबर, भात)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोयापेट्टा पोलिस स्टेशनमध्ये करुणानिधी आणि त्यांचा मुलगा स्टालिन यांच्याविरुद्ध तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोप आहे, की त्यांच्या कार्यकर्त्यांनी एआयएडीएमके समर्थकांवर करुणानिधी यांच्या गोपालपुरम येथील निवासस्थानाजवळ घातक शस्त्रांनी हल्ला केला. करुणानिधी आणि त्यांच्या मुलावर हिंसा भडकवणे (कलम 147), हिंसा आणि घातक शस्त्रांचा वापर (कलम 148), घातक हत्यारांनी वार करणे (कलम 324), दुसर्यांच्या जीवाला धोक निर्माण करणे (कलम 336) आणि धमकी देणे व धमकावणे (506/2) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षेविरोधात जयललिता हायकोर्टात जाणार
एआयएडीएमके नेत्या जयललिता सोमवारी जामीनासाठी हायकोर्टात अर्ज करु शकतात. तसेच त्यांच्या वकीलांकडून शिक्षेविरोधात अपील करण्याचीही रणनीती आखली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होऊ शकते. कारण, सण-उत्सवांमुळे हायकोर्टाला 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सुटी आहे. व्हॅकेशन बेंच मंगळवारी सुरु राहाणार आहे.
(छायाचित्र - डीएमके प्रमुख एम. करुणानिधी)