आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयललितांच्या प्रकृतीवरून निराश वयोवृद्धाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोइम्बतूर - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती खराब असल्यामुळे प्रचंड नैराश्य आलेल्या एका ७० वर्षीय समर्थकाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्रिपुरमध्ये ते अण्णाद्रमुकचे सचिव होते. गुरुवारी जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल वृत्तपत्रातून वाचल्यानंतर ते आणखीनच अस्वस्थ झाले होते. त्यामुळे घरात त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २२ सप्टेंबर रोजी जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या अद्यापही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
अफवा पसरवली, दोघांना अटक : जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवल्याबद्दल आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. रमेश व सुरेश अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही राष्ट्रीय बँकेत नोकरीला आहेत.
बातम्या आणखी आहेत...