आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayalalithaa Leaves For Bangalore For Verdict In DA Case

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता दोषी; 4 वर्षांची शिक्षा, 10 वर्षे निवडणुकीपासून दूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि त्यांच्या तीन सहकार्‍यांना बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी बंगळुरु विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जॉन मायकल डिकुन्हा यांनी पराप्पना अग्रहारा तुरुंग परिसरात तयार करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हा निर्णय दिला आहे. या सुनावणीसाठी एआयएडीएमके पक्षाच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री जयललिता बंगळुरुला आल्या आहेत. जयललिता यांना कोर्टाने चार वर्षांचा तुरुंगवास सुणावणाल आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंगळुरु कोर्ट परिसर आणि तामिळनाडुमध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात जयललिता यांना चार वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे शिक्षेची चार आणि पुढील सहावर्षे त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावार परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांची सहकारी शशिकला, पुतणी इला वारसी, पुतण्या सुधाकरन यांचा समावेश आहे. हायप्रोफाइल खटला असल्याने पाच टप्प्यांत सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम आणि बंगळुरु आणि तामिळनाडूमधील कडक बंदोबस्त

(छायाचित्र - बंगळुरु विशेष न्यायालयाकडे जात असतान मुख्यमुंत्री जयललिता)