आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayalalithaa Loyalist O Panneerselvam Is New Chief Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चहा विक्री करत होते पन्नीरसेल्वम, आज घेणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - एआयएडीएमके नेत्या जयललिता यांना भ्रष्टाचार प्रकरणी चार वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर ओ पन्नीरसेल्वम आज (सोमवार) तामिळनाडुचे नवे मुख्यमंत्री होतील. मृदुभाषी पन्नीरसेल्वम जयललिता यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. OPS नावाने ते परिचीत आहेत. जयललितांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. 2001 मध्येही जयललिता यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. तेव्हा 6 महिने ते मुख्यमंत्री होते. तेव्हा सुप्रीम कोर्टाने भुखंड घोटाळ्यात जयललिता यांना दोषी ठरविले होते. या प्रकरणात त्या दोषमुक्त झाल्यानंतर त्यांनी जयललिता यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद रिकामे केले होते.
सौम्य स्वभावाचे पन्नीरसेल्वम चहा विक्री आणि शेती करुन या पदावर पोहोचले आहेत. रविवारी त्यांनी राज्यपाल के. रोसैय्या यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री झाले पण जयललितांच्या खुर्चीवर नाही बसले
जयललिता यांच्या बद्दल पन्नीरसेल्वम यांना किती आदर आहे, याची कल्पना त्यांच्या एका कृतीतूनच येते. 2001 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा सीएम ऑफिसमध्ये ते कधीच जयललिता यांच्या खुर्चीवर बसले नाही. सचिवालयातील व्हिजीटर चेअरवर बसूनच ते राज्याचा कारभार पाहात होते. जयललिता यांच्या अनुपस्थितीत त्यांनी किचकट फाइलींना हातही लावला नाही.
(अम्मांसाठी वकिलांची फौज, कर्नाटक उच्च न्यायालयात आज अर्ज दाखल करणार)
नगरसेवक ते मुख्यमंत्री
ओ पन्नीरसेल्वम यांचा जन्म जानेवारी 1951 मध्ये झाला, दक्षिण तामिळनाडूच्या प्रभावशाली मुदुकुलाथोर समुदायातून ते आले आहेत. राजकारणात येण्याआधी ते चहा विक्री करत होते, तर त्यांच्या कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय होता. 1996 मध्ये पेरियाकुलम महानगरपालिका निवडणुकीतून ते सक्रिय राजकारणात आले. आता थेनी जिल्ह्यातील बोडीनाकनूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते 1972 ला ते पक्षाचे प्राथमिक सदस्य झाले होते. 2001 मध्ये पेरियाकुलम विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.
पन्नीरसेल्वम यांच्या बंधुंचे आजही चहाचे दुकान
पन्नीरसेल्वम यांचे वडील शेतकरी होते. मात्र ते एआयएडीएमकेचे संस्थापक एम.जी.रामचंद्रन (एमजीआर) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत होते. पन्नीरसेल्वम यांच्या बंधुचे आजही पेरियाकुलम येथे चहाचे दुकान आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जयललिता यांच्याशी पनीरसेल्वम यांची ओळख शशिकला यांचे नातेवाइक टीटीके दिनाकरन यांच्या माध्यमातून झाली.