आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jayalalithaa Said It Was A Conspiracy By Dmk To Destroy Me Personally And Politician

बेहिशेबी मालमत्ता: १९ वर्षे जुना खटला, १० सेकंदांतच जया दोषमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू, चेन्नई- १९ वर्षे जुन्या बेहिशेबी मालमत्ता खटल्यात एआयडीएमकेच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांची सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकाल जाहीर होताच संपूर्ण तामिळनाडूपासून दिल्लीपर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला.

न्यायमूर्ती सी. आर. कुमारस्वामी सोमवारी ठीक ११ वाजता न्यायालयात पोहोचले. केवळ १० सेकंदांतच त्यांनी या निकालाचा आवश्यक भाग वाचला. संपूर्ण कार्यवाही फक्त ४ मिनिटांत संपली. जयललितांसह त्यांची मैत्रीण शशिकला, नातेवाईक इलावर्सी व व्ही. एन. सुधाकर हेदेखील निर्दोष मुक्त झाले. जयललिता १९९१ ते १९९६ काळात प्रथमच मुख्यमंत्री झाल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींच्या तक्रारीवरून १९९६ मध्ये त्यांच्यावर ६६ कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा आरोप ठेवला होता. मागच्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाने चारही आरोपींना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

सोने खरे सिद्ध : जयललिता
>राजकीय शत्रूंनी माझ्यावर लावलेले डाग मिटले आहेत. खरे सोने सिद्ध झाले. बदनामीचे षड‌्यंत्र उधळले गेले.
- जे. जयललिता, एआयडीएमकेच्या प्रमुख

युक्तिवादाची संधीच नाही
सरकारी वकील आचार्य म्हणाले, जयांच्या वकिलांनी २ महिने बाजू मांडली. आम्हाला एकच दिवस मिळाला.

असा पालटला विशेष न्यायालयाचा निकाल
> विशेष न्यायालयाने ६६.४४ कोटींची संपत्ती व ९.३४ कोटी उत्पन्न मानले होते. उच्च न्यायालयाने ३७. ५९ कोटींची संपत्ती, ३४.७६ कोटींचे उत्पन्न धरले. म्हणजे बेहिशेबी मालमत्ता आली २.८२ कोटींवर (८.१२ %). बेहिशेबी मालमत्ता १० टक्क्यांहून कमी असेल तर निर्दोष मुक्तता होते.
>उच्च न्यायालयाच्या मते विशेष न्यायालयाने प्राप्तिकर विभागाचे आदेश आणि निर्णयांकडे दुर्लक्ष केले. जयललितांचे वकील सुरुवातीपासूनच हा आरोप करत होते.
>विशेष न्यायालयाने लग्नात ३ कोटी खर्च केल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला होता. परंतु वाढीव खर्चाचे दावे केले. त्या दाव्यांना पुराव्यांचा आधार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

जयललिता उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
>तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्व्हम राजीनामा देतील. बुधवारी जयललिता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
>सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभा लढवावी लागेल. शिक्षेमुळे त्यांची श्रीरंगमची आमदारकी रद्द झाली होती.
>वर्षभरानंतर तामिळनाडूत निवडणुका. मुदत संपण्याआधीच विधानसभा बरखास्त केली जाण्याची दाट शक्यता.
>जयांंवर १०,५०० साड्या, ७५० जोड्या बूट, ९१ घड्याळे बाळगल्याचा आरोप होता. पुराव्यातच घोळ असल्यामुळे साड्या, बुटांची किंमत संपत्तीत धरली नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.