आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayalalithaa Supporters Agitation Outside Court In Bangloru, Divya Marathi

संताप आणि तणावाची तीन मिनिटे...दोन हजार अम्मा समर्थक वकिलांचा बंगळुरूत ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - सकाळी १०.०० ची वेळ. कर्नाटक उच्च न्यायालयातील पहिला मजला. हॉल क्रमांक ११. दस-याच्या सुट्या असतानादेखील एका खटल्यासाठी विशेष न्यायालयातील हा एक दिवस. तामिळनाडूच्या मावळत्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासाठी चार वर्षे शिक्षा आणि १०० कोटी रुपये दंडाच्या निर्णयानंतर सर्वात महत्त्वपूर्ण क्षण. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. ठीक १०.३० वाजता न्या. रत्नकला न्यायालयात आल्या. राम जेठमलानी यांच्यासह आठ वकील आधीपासूनच हजर आहेत. दोनशेपेक्षा जास्त वकिलांची आसपास उपस्थिती.
न्यायाधीश आतमध्ये येताच तामिळनाडूचे दोन माजी मंत्री सी. षण्मुगवेलू आणि सेमा वेलुस्वामी सतर्क झाले. केवळ तीनच मिनिटे होतात न होताच तोच सर्व वकील हातात मोबाइल घेऊन कोर्ट रूममधून बाहेर पडतात. राग आणि तणाव स्पष्ट दिसत होता. सर्वजण एकच संदेश टाइप करत होते, दिलासा नाही, न्यायालयाने पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला ठेवली आहे.
कामकाज सुरू होताच भ्रष्टाचार विरोधी दक्षता विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील जी. भवानीसिंह यांनी जयललितांच्या जामीन अर्जावर आक्षेप दाखल करण्याची परवानगी मागितली. न्यायमूर्ती रत्नकला यांनी जामीन अर्जावर सुनावणी नियमित न्यायालयातच सुरू ठेवण्याचे आदेश दिले. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांना काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. न्यायमूर्ती जाताच जयललिता समर्थक वकील कोर्ट रूममध्ये आक्रमक झाले. ते मोठमोठ्याने तामिळीमध्ये बोलत होते. सुनावणीच पुढे ढकलायची होती, तर मग विशेष न्यायालयाची औपचारिकता कशासाठी करण्यात आली? ही कसली चेष्टा आहे?

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेच्या वकील विभागाचे जवळपास ५० हजार सदस्य आहेत. राज्यातील एकही जिल्हा असा नसेल जेथून वकील बंगळुरूला आले नसतील. प्रकरण कायद्याशी निगडित असल्याने जवळपास २ हजार वकील बंगळुरूमध्ये आहेत. एका पक्षाच्या नेत्याने सांगितले की, सर्व मंत्री बंगळुरूतच तळ ठोकून आहेत. तामिळनाडूतून आलेल्या अम्मा समर्थकांचा दावा असा की, जितक्या रकमेचा खटला अम्मांवर सुरू आहे, ती रक्कम त्यांच्यासाठी फारशी महत्त्वाची नाही. त्या अभिनेत्री राहिल्या असून आधीपासूनच श्रीमंत आहेत; परंतु या प्रकरणाला अधिकच महत्त्व दिले गेले. दस-यापूर्वी शिक्षेला स्थगिती तसेच अम्मांना जामीन मिळण्याची शक्यता गृहीत धरून अम्मा समर्थक जल्लाेषाच्या तयारीत होते; परंतु त्यांना निराश होऊन परतावे लागले.