आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: जयललितांंवर उपचार करत असलेले डॉक्टर्स म्हणाले, \'आमचा जीव आणि नोकरी संकटात\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- ३३ दिवस उलटले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टर्स हेच सांगतात की, त्या ठीक आहेत. परंतु त्यांच्या आजारपणाबद्दल काही सांगितले जात नाही. दिव्य मराठी नेटवर्कने जयललिता यांचा आजार त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती जमवली आहे. केरळच्या एका डॉक्टरच्या माध्यमातून जेव्हा अपोलोच्या डॉक्टरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता उत्तर मिळाले की, "माझा जीव आणि नोकरी दोन्ही संकटात आहे. काहीही सांगू शकत नाही."
वाचा संपूर्ण रिपोर्ट...
- २२ सप्टेंबरच्या रात्रीच्या ९.४५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाेएस उद्यानात मुख्यमंत्री बेशुद्ध झाल्याची माहिती आली.
पहिला फोन अपोलो हॉस्पिटलच्या मालकाची कन्या तथा सीईआे प्रिथा रेड्डी यांना केला. त्यानंतर अपोलोमधून अॅम्ब्युलन्स रवाना झाल्या. ३० मिनिटांनंतर जयललितांना बेशुद्धावस्थेतच अपोलोच्या आयसीयूत आणले.
- २३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्सचे तीन डॉक्टर चेन्नईला पाठवले. त्यातच जयललितांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची शुगरही वाढली. रक्तदाबही नियंत्रणात नव्हता. त्यांना पेसमेकर लावले.
- २८ पासून त्यांची प्रकृती आणखीनच ढासळत गेली. अनेक अवयव निकामी होण्याचे संकट आेढवले. मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाला. २८ रोजी जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले. लंडनहून डॉ. रिचर्ड जॉन बेले यांना बोलावले. सिंगापूरहून डॉक्टरांचे पथक आले. जयललितांवर अपोलोमध्ये १८ डाॅक्टरांचे पथक निगराणी ठेवून आहेे.
- डॉक्टरांना २४ तास रुग्णालयात राहण्यास सांगितले आहे. त्यात डॉ. रमेश व्यंकटरमण, डॉ. सेंथिलकुमार, डॉ. बाबू अब्राहम, डॉ. वायव्हीसी रेड्डी प्रमुख आहेत. ९ परिचारिका आहेत. त्यांचे फोनही काढून घेतले आहेत. त्यांना संभाषणास मनाई आहे. त्यांच्या फोनवर गुप्तचर यंत्रणेची नजर आहे.
- जयांच्या गळ्यात ट्रायको नळी आहे. त्यातून त्या द्रवपदार्थ ऑक्सिजन घेतात. नळीमुळे बोलता येत नाही. इशाऱ्याने संवादाचा प्रयत्न करतात. वजनही बरेच घटले आहे. त्यांना लिहूनदेखील काही सांगता येऊ शकते. पॅसिव्ह फिजिआेथेरपी सुरू असल्याने हात-पाय हलवू शकत नाहीत. डॉक्टरांनी हसण्यास सांगितले. तेव्हा जयांनी स्मित केले होते.
बातम्या आणखी आहेत...