आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकच्या एक दिवस आधी जयललिता पूर्णपणे शु्द्धित होत्या: AIIMS च्या रिपोर्टमध्ये दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- जयललितांना ह्रदयविकाराचा झटका आला त्याच्या एक दिवस म्हणजे 4 डिसेंबरला त्या पुर्णपणे शुद्धित होत्या. हार्ट अटॅकनंतर त्यांची स्थिती अतिशय नाजूक झाली आणि दुसऱ्या दिवशी निधन झाले, असा दावा एम्सच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सोमवारी एम्सचा रिपोर्ट जाहिर करण्यात आला. जयललितांच्या निधनानंतर 21 दिवसांनी हा रिपोर्ट जाहिर करण्यात आला आहे. 

20 मिनिटे खुर्चीवर बसु शकत होत्या जयललिता... 
- एम्सचे डॉ. जी.सी. खिलनानींसह 4 डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जयललिता पुर्णपणे शुद्धित होत्या. 20 मिनिटांपर्यंत त्या खु्र्चीवर बसू शकत होत्या. परंतु, न्यूरोमस्कुलर वीकनेसमुळे त्यांना उभे राहता येत नव्हते. 
- 3 डिसेंबरला हे चारही डॉक्टर्स चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. ही टीम त्याच दिवशी दिल्लीला परत गेली होती आणि 5 डिसेंबर संध्याकाली चौथ्या आणि शेवटच्या वेळी या हॉस्पिटलमध्ये आली होती असा रिपोर्ट तामिळनाडू सरकारने जाहिर केला आहे.
- एम्सच्या डॉक्टरानी सांगितले की, जयललितांना फिजियोथेरेपी देण्याची गरज होती, परंतु त्यांना आधीपासूनच पॉलीन्यूरोपॅथी आजार होता. त्यामुळे त्यांना पूर्णपणे ठिक होण्यासाठी अनेक आठवडे लागले असते.

संध्याकाळी 4:30 वाजता आला होता हार्ट अटॅक...
- एम्सच्या डॉक्टरांनुसार, त्यांना सागण्यात आले की, जयललितांना 4 डिसेंबरच्या संध्याकाळी 4:30 वाजता अटॅक आला होता.
- यानंतर 45 मिनिटे त्यांच्या हार्टला पंप करण्यात आले, त्यांनंतर ओपन कार्डिएक मसाज करण्यात आला. त्यांनंतर त्यांना इसीएमओ आणि पेसमेकर लावण्यात आले.
- रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जयललितांच्या शरिराचे टेम्परेचर नेहमी कमी राहत होते आणि त्यांना सतत हीमोडायलिलिस करण्यात येत होते.

प्रत्येक प्रयत्न निष्फळ जात होता...
- रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जयललितांच्या बॉडीचे टेम्परेचर नॉर्मल झाल्यानंतर रात्री 10 वाजेदरम्यान परत तपसण्यात आले. तेव्हा ब्लडप्रेशर वेगाने कमी होत असल्याचे समोर आले.
- इसीएमओ लावल्यानंतर समजले की, त्यांच्या ह्दयाने काम करणे बंद केले आहे. पेसमेकर लावल्यानंतरही मॉनिटरवर सरळ  रेषा दिसत होती.
- न्यूरोलॉजिस्टनुसार जयललितांना वाचवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न निष्फळ होत होता. त्यानंतर एम्सच्या टिमने निर्णय घेतला की, अपोलोची टीम जयललितांचा परिवाराशी बोलेल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...