आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jayalalithaas Kin Perform Last Rites Again For Moksha, Relatives Of Jayalalithaa Were Upset Over The Burial

जयललितांवर पुन्हा अंत्यसंस्कार, मोक्षासाठी पार्थिवाऐवजी बाहुलीला दिला अग्नि

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसुर/चेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाला 10 दिवसही पूर्ण होत नाही तोच नव्या वादाला तोंंड फुटले आहे. जयललितांच्या पार्थिवावर द्रविडीयन परंपरेने अंंत्यसंंस्कार (दफनविधी) करण्‍यात आले होते. यावर जयललितांंच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जयललितांंना मोक्ष मिळावा, यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी पुन्हा एकदा हिंदू परंपरेप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

श्रीरंगपटना येथे कावेरी नदीच्या काठावर मंगळवारी हा विधी करण्यात आला. जयललिता यांच्या पार्थिव शरीराऐवजी चितेवर एक बाहुली ठेवण्यात आली होती. जयललिता यांचा सावत्र भाऊ वरदराजू याने चितेला अग्नि दिला.

दरम्यान, चेन्नईतील मरीना बीचवर 6 डिसेंबरला AIADMK च्या सुप्रिमो जयललिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्‍यात आले होते. पक्षाचे नेते एमजीआर मेमोरिअरशेजारी जयललितांचे पार्थिव दफन करण्यात आले होते. जयललितांची जवळची मैत्रिण शशिकला यांच्या हस्ते अंत्यसंस्काराचा विधी पार पाडण्यात आला होता.

जयललितांंच्या सावत्र भावाने पुन्हा केले अंत्यसंस्कार...
- जयललिता यांचा सावत्रभाऊ एन.जे. वसुदेवन यांनी सांगितले की, आम्ही आयंगर ब्राह्मण आहे. मोक्ष मिळण्यासाठी जयललिता यांच्यावर हिंदू परंपरेप्रमाणे पुन्हा अंत्य संस्कार करण्यात आले.
- श्रीरंगपटनम येथे कावेरी नदीच्या काठावर मंगळवारी जयललितांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अंत्यसंस्कार करण्‍यात आले.
- श्री रामानुजाचार्य श्रीवैष्णव परंपरेने अंत्यसंस्कार केल्याचे वासुदेवन यांनी सांगितले.
- वासुदेवन, जयललितांच्या वडिलांची पहिली पत्नी जयम्मा यांचे पुत्र आहेत. टी नरश्रीपूर तालुक्यातील एका गावात ते राहातात.
चितेवर ठेवण्यात आली बाहुली...
जयललितांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी त्यांच्यावर हिंदु परंपरेने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते, असे पुरोहीत रघुनाथ अय्यांगर यांनी सांगितले. प्रतिकृती म्हणून चितेवर एक बाहुली ठेवण्यात आले होते. पुढील 4-5 दिवस काही विधी करावे लागणार असल्याचे रघुनाथ अय्यांकर यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, जयलतितांच्या पार्थिवावर झाले होते द्रविडीयन पद्धतीने अंत्यसंस्कार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...