आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परग्रहावरील जीवसृष्टीचे गूढ उकलणार - जयंत नारळीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेनाली - परग्रहावर जीवसृष्टी आहे का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांपासून संशोधकांपर्यंत सर्वांसाठी कुतूहलाचा ठरला आहे. परंतु लवकरच हे गूढ उकलणार आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, असा दावा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केला आहे.


परग्रहावरील जीवसृष्टीचा वेध अनेक वर्षांपासून माणूस घेत आहे. परंतु अद्याप त्यात यश आलेले नसले तरी संशोधक या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचले आहेत. त्यासाठी जुन्या लोककथा, आधुनिक विज्ञानावर आधारित चित्रपटांना केवळ कल्पना म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. त्याचाही संशोधनामध्ये उपयोग झाला, असे नारळीकर म्हणाले. ‘जगात आपण एकटेच आहोत का ?’ या विषयावर आधारित व्याख्यानात ते बोलत होते. नायुडम्मा स्मृती पुरस्कार समारंभानिमित्त रविवारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.


गृहीतक काय मांडले ?
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खूप उंचीवर जिवाणू आढळून आले आहेत. या जिवाणूंच्या अभ्यासातून परग्रहावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाबद्दलचे ठोस उत्तर नजीकच्या काळात मिळू शकते. एका विशिष्ट कार्यक्रमाद्वारे त्यांच्यापर्यंत संदेश पाठवण्यात आला आहे. त्यांचा प्रतिसाद मिळण्यासाठी कदाचित काही दशकेदेखील लागू शकतील. त्यामुळे माणसाला प्रचंड संयम ठेवावा लागणार आहे, असे गृहीतक नारळीकर यांनी व्याख्यानातून मांडले.