आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jayaram Jayalalitha Is Set To Return As The Chief Minister Of The Southern Indian State Of Tamil Nadu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ महिन्यानंतर समर्थकांसमोर येणार जयललिता, उद्या शपथविधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टातून निर्दोष मुक्त झालेल्या एआयएडीएमके सर्वेसर्वा जे. जयललिता शनिवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत. आज सकाळी त्यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल के. रोसैय्या यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला.
जवळपास आठ महिन्यांपासून जयललिता सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या. त्या आज (शुक्रवार) एका सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. सकाळी त्यांनी पक्षाचे संस्थापक एम.जी. रामचंद्रन यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण केला. सकाळपासूनच चेन्नईच्या रस्त्यांवर त्यांचे समर्थक जमा झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी जयललिता यांचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावलेले आहेत.
10 मिनिटात झाली विधीमंडळ नेत्याची निवड
शुक्रवारी सकाळी एआयएडीएमके आमदारांची बैठक झाली. यात जयललिता यांची एकमताने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला जयललिता उपस्थित नव्हत्या. केवळ 10 मिनीटांच्या या बैठकीत मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे जाऊन राजीनामा सादर केला आणि नंतर अम्माला भेटण्यासाठी त्यांच्या पोएस गार्डन येथील निवासस्थानी गेले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राज्यपालांना भेटल्या जयललिता, रस्त्यांवर फक्त जयललिता
बातम्या आणखी आहेत...