आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JD Meeting Today, Party Stand With Deputy Chief Minister Tejashwi Yadav As It Happened

लालूपुत्र तेजस्वी यादव देणार नाही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; RJD च्या बैठकीत झाला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर सीबीआय, इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने (ईडी) केलेल्या धाडसत्राच्या कारवाईनंतर पहिल्यांदा जदयूच्या आमदारांची आज (सोमवारी) बैठक झाली.

तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर बैठकीत चर्चा झाली नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्धीकी यांनी सांगितले. ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. ते विधिमंडळ नेते आहेत आणि भविष्यातही राहातील.

जगदानंद सिंग यांनी सांगितले की, सीबीआयच्या छापेमारीनंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांनी फोनवर चर्चा केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात रेल्वे निविदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यांच्यासह 7 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्याचप्रमाणे लालूंचे थोरली कन्या मीसा भारती आणि जावई शैलेश यांच्या तीन ठिकाणच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते. यानंतर भाजपने तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

देशाची अवस्था चिंताजनक- RJD
- RJD च्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. अब्दुल बारी सिद्धीकी यांनी सांगितले की, बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला- देशाची आर्थिक स्थिती, दुसरा- राष्ट्रपती निवडणूक आणि तिसरा - 27 जुलैला पक्षाची रॅली.
- देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. त्यात देशावर दहशतीचे सावट आहे. याला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला टार्गेट केले जात आहे.
-लालूंच्या मागे लागलेला ससेमीरा हा देखील सरकारचीच देण आहे. मात्र, लालू अडचणीत सापडले तेव्हा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला आहे. पक्ष मजबुतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. बैठकीत तेजस्वी यांच्या कामाची प्रशंसा करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...