आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू - नितीशकुमारांचा असेल एकच पक्ष, विलिनीकरणासाठी RJD ने उचलेल पहिले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव जनता दलाच्या सर्व गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या नव्या पक्षाची बांधणी करताना सर्वात प्रथम लालू यादवांचा राजद आणि जनता दल संयूक्त एक होऊ शकतात. झारखंड निवडणुकीनंतर या दिशेने पावले उचलली जाऊ शकतात आणि फेब्रुवारीपर्यंत नवा पक्ष आकाराला येण्याची शक्यता आहे. बिहार सरकारमधील मंत्री आणि जदयू नेते रमई राम यांनी देखील सोमवारी दोन्ही पक्ष एकत्र आले तर चांगले परिणाम पाहायला मिळतील असे म्हटले आहे.
दिल्लीत झाली चर्चा
राजदचे बिहार प्रदेशाध्यक्ष डॉ. रामचंद्र पूर्वे यांनी मान्य केले, की राष्ट्रीय नेत्यांची दिल्लीत यासंबंधी चर्चा झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातील लालू यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यासंबंधीची बैठक झाली. या बैठकील पक्षाचे महत्त्वाचे डझनभर नेते उपस्थित होते. यापुढे सर्व समाजवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास भाजप आणि मोदींना रोखणे सोपे आहे. 1988 मध्ये देशातील सर्व समाजवादी एकत्र होते, असा दाखलाही यावेळी देण्यात आला. पाटण्यात परतल्यानंतर अध्यक्षांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव पक्षविलिनीकरणात येणार्‍या अडचणी कोणत्या असतील याची यादी करत आहेत. विलिनीकरणामध्ये जेडीयूकडून ज्या सुचना आणि शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत त्यांच्यावरही गांभीर्याने विचार होत आहे. लालू यादव 20 नोव्हेंबर रोजी झारखंडमधून पाटण्यात परतल्यानंतर, विलिनीकरणासंबंधीचा आढावा त्यांच्यासमोर मांडला जाणार आहे.
एकत्रित नेतृत्वात लढणार विधानसभा निवडणूक
विलिनीकरणानंतर विधानसभा निवडणूक ही कोणा एकाच्या नेतृत्वात न लढता संयुक्त नेतृत्वात लढल्या जातील, यामुळे नेतृत्वाचा वाद निर्माण होणार नाही. पक्षाचे स्वरुप देखील प्रादेशिक न राहाता राष्ट्रीय होईल. पक्षाचे संसदीय मंडळ असेल जे तिकीट वाटपाचे काम करेल. निवडणूकीतील विजयानंतर पक्षाचा विधिमंडळनेता देखील केंद्रीय संसदीय मंडळ निवडेल. यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात लढाचे हा वाद देखील संपुष्टात येईल.
नितीशकुमारांनीही दिले संकेत
महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद यादव, नितीशकुमार आणि लालू यादव यांचे पक्षविलिनीकरणासाठी एकमत झाल्याचे मानले जात आहे. मुलायमसिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पूर्वीचे जनता दलातील हे सर्व नेते एकत्र जमले होते आणि त्यांनी यावर विचार केला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून आरजेडी-जेडीयू यांच्या विलिनीकरणाचे काम सुरु झाले आहे. या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी संकेत दिले होते, की गरज पडली तर जनता दलाचे जुने मित्र पु्न्हा एकत्र येतील.

फोटोः 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीत समाजवादी पक्षप्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या घरी एकत्र आलेले देवगौडा, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि शरद यादव.