आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतीश कुमारांना हुकूमशहा म्हणणार्‍या पाच बंडखोर खासदारांची हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- जनता दल यूनाइटेडने आज (गुरूवारी) पाच बंडोखोर खासदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात चार लोकसभेचे तर एक राज्यसभेतील खासदारांचा समावेश आहे. सर्वश्री खासदार सुशील कुमार सिंह, मंगनीलाल मंडल, जयनारायण निषाद आणि पूर्णमासी राम अशी त्यांची नावे आहेत. याबरोबर राज्यसभेचेल माजी खासदार शिवानंद तिवारी यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

पक्षातील शिस्त न पाळल्यामुळे पाच खासदारांवर ही कारवाई करण्यात आल्याचे जदयू नेता केसी त्यागी यांनी सांगितले. तिवारी यांना राज्यसभेची उमदेवारी न दिल्याने पक्षाविरोधात त्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले होते. तिवारी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना हुकूमशहा आणि स्वार्थी असल्याची टीका केली होती. त्याबरोबर राष्ट्रीय जनता दलात निर्माण झालेल्या वादळालाही नीतीश कुमार हेच जबाबदार असल्याची विखाली टीका तिवारी यांनी गुरुवारी झाला. दुसरीकडे खासदार पूर्णमासी राम नीतीश कुमार यांना हिटलर म्हणून संबोधले होते.

पूर्णमासी राम हे गोपालगंजचे खासदार आहेत. खासदार जयनारायण निषाद हे मुजफ्फपूर येथून निवडून आले आहेत. निषाद यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. निषाद यांनी मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबाही दर्शवला आहे.