आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • JD(U) News In Marathi, Divya Marathi, Rajya Sabha By Polls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बंडखोरी करणा-या 18 बंडखोरांची जदयूतून हकालपट्टी ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बंडखोरी करणा-या 18 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे संकेत जनता दल संयुक्त पक्षाने दिले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचा ठपका या आमदारांवर आहे.
राज्यसभेतील बंडखोरीची पक्षाने गांभीर्याने दखल घेतली असून 18 आमदारांचा अहवाल पक्षाच्या शिस्तपालनविषयक समितीसमोर सादर करण्यात आला आहे, असे संसदीय कार्यमंत्री श्रवणकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यसभेसाठी पक्षाने व्हिप बजावला होता, परंतु सदर आमदारांनी तो धुडकावला. हा अहवाल पक्षाध्यक्ष शरद यादव, मुख्यमंत्री जितन राम मांझी, प्रदेशाध्यक्ष बसिष्ठ नारायण सिंग आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही सादर करण्यात आला आहे. पक्षादेशासंबंधी नियम क्रमांक 10 नुसार अधिकृत उमेदवारासाठी पक्ष पात्र सदस्यांना आदेश बजावू शकतो, परंतु त्याचे उल्लंघन करणे चुकीचे ठरते. म्हणूनच बहुदा बंडखोर आमदारांनी पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा, असे सांगून कुमार यांनी त्यांच्या हकालपट्टीचे संकेत दिले.

नेमके प्रकरण काय?
जदयूने मुत्सद्दी पवन कुमार व गुलाम रसूल बलयावी असे दोन उमेदवार उभे केले होते, परंतु 18 बंडखोर आमदारांनी मात्र भाजपसोबत हातमिळवणी करून अपक्ष उमेदवार अनिल शर्मा आणि साबिर अली यांना मतदान केले.