आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JD(U) Nominee Will Forfeit Deposit If I Want, Claims Minister News In Marathi

विरोध केल्यास अध्यक्षांची अनामत जप्त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमुई - जदयूचे ज्येष्ठ नेते आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोरच बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी खैरामध्ये आयोजित सभेत जदयूचे उमेदवार आणि विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांची तुलना नक्षलवाद्यांशी केली.

ते म्हणाले, नितीशजी, ज्या दिवशी मी विरोध करेन त्या दिवशी आपल्या उमेदवाराची अनामत जप्त होईल. ते जर हारले तर आमच्यावर खापर फोडू नका.

नितीश उदय नारायण चौधरी यांच्या सभेसाठी उपस्थित होते. या वेळी चौधरीही मंचावर होते. नरेंद्र सिंह एवढ्यावरच थांबले नाहीत. आम्ही पक्षाला विरोध करत असल्याचा अपप्रचार केला जात आहे. नरेंद्र सिंह चौधरी यांनाही उघड आव्हान दिले. लोक उदय नारायण चौधरी यांनी नक्षलवादी म्हणत आहेत. चौधरी यांच्यासारखे 100 नक्षलवादी जमुईमध्ये तयार झाले तरीही काही फरक पडणार नाही. मात्र, अल्पावधीत स्वत:वर नियंत्रण मिळवत त्यांनी चौधरी नक्षलवादी नसल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री दामोदर रावत यांनाही कृषिमंत्र्यांनी फटकारले. रावत चुकीच्या लोकांना घेऊन फिरत असल्याचे ते म्हणाले.

नरेंद्र यांच्या भाषणाचा अर्थ
कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत उघड आव्हान दिल्यामुळे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमध्ये केवळ नितीश कुमार यांचाच प्रभाव नाही हे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न. दुसरीकडे जमुईतील उमेदवार निवडीत स्वत:ला उपेक्षित ठेवल्याचा बदला घेण्यात आला.