आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JDU Suspended Manjhi 7 Minister Party President Sharad Yadav Action

मांझी गटाने जारी केलेला व्हिप नितीशकुमार समर्थक आमदाराने फाडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभेत मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना 20 फेब्रुवारी रोजी बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यासाठी मांझी गटाच्या राजीव रंजन यांनी जारी केलेला व्हिप नितीशकुमार समर्थक आमदार मंजीत सिंह यांनी फाडून टाकला. ते म्हणाले, त्यांना व्हिप जारी करण्याचा अधिकार नाही.
त्याआधी मांझी यांना साथ देणार्‍या सात मंत्र्यांना जनता दल (यू) मधून निलंबित करण्यात आले आहे. जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी मंगळवारी कृषीमंत्री नरेंद्र सिंह, शिक्षणमंत्री वृक्षिण पटेल, नगरविकास मंत्री सम्राट चौधरी, ग्रामीणविकास मंत्री नीतीश मिश्रा, माहीत तंत्रज्ञान मंत्री शाहिद अली खान आणि उद्योग मंत्री भीमसिंह, महाचंद्र प्रसाद यांना निलंबित केले आहे. तर, मांझी यांना याआधीच पक्षातून बरखास्त केले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री मांझी यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थक आंमदारांची बैठक सुरु आहे.
जदयू प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी 2 फेब्रुवारी रोजी मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांनतर पक्षाध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई केली. निलंबनावर सम्राट चौधरी आणि भीमसिंह म्हणाले, आम्हाला तसे काही कळविले नव्हते आणि तसे झाले असेल तर ती एकतर्फी कारवाई होती.
मांझीबद्दल भाजप आज निर्णय घेणार
बिहारमध्ये वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक आज होणार आहे. यात मांझी यांना समर्थन द्यायचे की नाही याबद्दलची रणनीती ठरविण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मांझी यांच्या समर्थनार्थ 30-35 आमदार पुढे आले तर त्यांचे सरकार वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते. बिहार भाजप नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले, पक्षाच्या बैठकीत आमदारांचे मत जाणून घेतले जाईल. दुसरीकडे अशीही माहिती आहे, की भाजपचे काही आमदार जदयू आणि राजदच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजप सतर्क झाला आहे. मोदी म्हणाले, आम्ही आमची रणनीती 20 तारखेला सभागृहातच उघड करु.
नितीशकुमार म्हणाले, माझ्याकडून काही चुका झाल्या आता त्या सुधारणार...
माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मान्य केले आहे, की माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत, आता त्यात सुधारणा करण्याची वेळ आली आहे. मला अनेक ठिकाणांहून मांझीविरोधात तक्रारी येत होत्या. अनेक लोक माझ्या निर्णयावर नाराज होते. आता माझ्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची वेळ निघून गेली असली तरी त्यात सुधारणा करायची आहे.
दरम्यान, मंगळवारी जदयू आमदार विनोद सिंह यांच्या निवासस्थानी मेजवानी ठेवली होती. त्याची आणखी छायाचित्रे पुढील स्लाइडवर.