आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JD(U) Sacks Manjhi; Elects Nitish Kumar As New Leader

उलथापालथ : बिहारमध्ये राजकीय पेच; मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारच्या राजकारणात सुरू झालेले महाभारत अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर पोहोचले आहे. पात्रं तीच आहेत, फक्त त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. आता चित्र आठ महिन्यांपेक्षा अगदी उलट आहे. त्यावेळी जे जीतनराम नितीशकुमार यांचे मांझी बनले होते, तेच मांझी आता नितीश यांच्या विरोधात आहेत. नितीशकुमार हे विधिमंडळ पक्षाचे नवे नेते आहेत. मांझी यांचे मुख्यमंत्रिपद जाणे निश्चित आहे.

मांझी यांनी शनिवारी आणखी १५ मंत्र्यांना बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालांना केली, पण जदयूने मांझी यांचीच नेतेपदावरून हकालपट्टी केली. जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांच्या घरी झालेल्या बैठकीत नितीश यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. एकेकाळी मांझींसोबत असणारे अर्जुन मांझी यांनीच नितीश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री मांझी बैठकीला गेले नाहीत. बैठक बोलवण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्याला असतो, पक्षाध्यक्षाला नाही असा दावा करत त्यांनी बैठकच अवैध ठरवली.

दोन मंत्र्यांच्या बडतर्फीची शिफारस स्वीकारली : राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पी. के. शाही आणि ललन सिंह यांना बडतर्फ करण्याची शिफारस मंजूर केली. मांझींनी शुक्रवारी रात्रीच दोघांना बडतर्फ करण्यास सांगितले होते. मात्र, मांझी अल्पमतात असल्याने त्यांची शिफारस मंजूर करू नये, अशी विनंती शरद यादव यांनी राज्यपालांना केली होती.

८ महिन्यांत असे बदलले चित्र
- त्या वेळी नितीश यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
- आता मांझी यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. २९ पैकी फक्त ७ मंत्रीच त्यांच्यासोबत आहेत.
- त्यावेळी २० मे २०१४ रोजी मांझी गावी जाण्याची तयारी करत होते. त्यांनी कपडे सुटकेसमध्ये भरलेही होते. त्यांना अचानक सुटकेससह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले.
- आता ७ फेब्रुवारी २०१५ ला तीच सुटकेस एवढी जड झाली की कुठल्याही स्थितीत मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर पडण्यास मांझी तयार नाहीत.