आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्वी दारु पितात, मुलीसोबतचा फोटो दाखवत JDU चा दावा, लालूंच्या मुलाचा इन्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजस्वी यादव यांचा मुलीसोबतचा फोटो दाखवताना जेडीयूचे नेते. - Divya Marathi
तेजस्वी यादव यांचा मुलीसोबतचा फोटो दाखवताना जेडीयूचे नेते.
पाटणा- तेजस्वी यादव यांचा एका मुलीसोबत फोटो दाखवत संयुक्त जनता दलाने ते दारु पितात असा आरोप केलाय या फोटो दारुच्या बाटल्या दिसत असल्याचे जेडीयूने म्हटले आहे. लालू यादव व त्यांचा मुलगा दारु पितात, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, माझा ज्या मुलीसोबत फोटो दाखविण्यात येत आहे तो राजकारणात येण्यापूर्वीचा आहे. एका कार्यक्रमादरम्यान या मुलीने माझ्यासोबत फोटो काढला होता. मी तिला ओळखत नाही. जेडीयू आणि आरजेडी दारुबंदीवरुन आरोप-प्रत्यारोप करत आहेत. 
 
मुलीच्या कुटूंबाची काय स्थिती झाली असेल
- तेजस्वी म्हणाले की, मी दोन दिवसांपासून पत्रकार परिषद घेत जेडीयूकडून उत्तर मागत होतो. पण जेडीयूने उत्तर देण्याऐवजी हा फोटो दाखवला.
- हे सगळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या इशाऱ्यावर होत आहे. ते बिहारच्या राजकारणाचा स्तर खालावत असून चारित्र्यहनन करत आहेत. या प्रकारच्या राजकारणास आमचा विरोध आहे. 
- जो फोटो दाखविण्यात येत आहे. तो जुना आहे. तो भाजपने अनेक वेळा सोशल मीडियावर वापरला आहे. 
- मला एवढेच विचारायचे आहे की, या फोटोत चुकीचे काय आहे? ज्या मुलीचा फोटो दाखविण्यात येत आहे तिचे लग्न झाले आहे. कदाचित तिला मुलेही असतील. तिच्या कुटुंबाची यामुळे काय स्थिती झाली असेल. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...