आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • JD(U) Serves Show cause Notice To Two Bihar Ministers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारच्या दोन मंत्र्यांना कारणे दाखवा नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पूंछमधील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबद्दल अवमानजनक वक्तव्ये करणार्‍या बिहारमधील दोन मंत्र्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. जद (संयुक्त) नेते शरद यादव यांनी या नोटिसा बजावल्या.

शहीद होण्यासाठीच ते लष्करात जातात : बिहारचे ग्रामीण विकासमंत्री डॉ. भीमसिंह यांनी पोलिस आणि लष्करात लोक शहीद होण्यासाठीच भरती होतात, असे वक्तव्य केले होते. पूंछमध्ये शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह विमानतळावर आले तेव्हा राज्याचा एकही मंत्री तेथे नव्हता. याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर सिंह यांनी शिरजोरी दाखवत पत्रकारांनाच फटकारले होते.

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंह यांनीही अकलेचे तारे तोडत पाकिस्तानला क्लीन चिट दिली होती. वर पाकिस्तान आपला छोटा भाऊ असल्याचे ते म्हणाले होते.