आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन परीक्षा देशातील 103 शहरांत होणार, 2 एप्रिल रोजी परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - जेईई मेन परीक्षा २०१७ ची केंद्रे शनिवारी जाहीर करण्यात आली. देशाबरोबरच परदेशातील कोलंबो, सिंगापूरसह आठ शहरांत ही परीक्षा घेतली जाणार आहे. देशातील १०३ शहरांत या परीक्षेसाठी केंद्र तयार केले जात आहे. येत्या २ एप्रिल रोजी ही परीक्षा होणार असून महाराष्ट्रातील ७ शहरांत या परीक्षेची केंद्रे असतील.
देश-विदेशात एकूण १११ शहरांत २ एप्रिल रोजी परीक्षा होईल. देशातील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईकडून आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. सीबीएसईने या परीक्षेसाठी विविध शहरांची निवड केली आहे.
महाराष्ट्रातील केंद्रे
सीबीएसईनुसार महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व ठाण्यात परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...