आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JEE Process Unfriendly To Poor Students, Anandkumar Critise

जेईईची प्रक्रिया गरीब विद्यार्थ्यांच्या विरोधात, आनंदकुमार यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - जेईई प्रवेश परीक्षेची 2014 ची मुख्य प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या व ऑफलाइनसाठी वेगळे शुल्क ठेवण्याच्या निर्णयावर सुपर 30 चे संस्थापक आनंदकुमार यांनी टीका केली आहे. ही पद्धती श्रीमंतांसाठी आणि गरिबांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आयआयटीमध्ये गरीब मुलांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांना मदत करण्यासाठी आनंदकुमार प्रसिद्ध आहेत. जेईईची पूर्वपरीक्षा पेपरलेस करण्याचा प्रस्ताव चांगला आहे; पण त्यामुळे देशात सर्वांना शिक्षण मिळण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. देशात 35 टक्के जनता दारिद्र्य रेषेखालील आहे. संगणक असणा-या शाळांची संख्याही अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय गरिबांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. जेईई 2014 ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 15 नोव्हेंबरला सुरू होऊन 16 डिसेंबरला संपेल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 600 रुपये, तर ऑफलाइन अर्जासाठी 1000 रुपये लागणार आहेत.