आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्स निकाल जाहीर, प्रथमच नीचांकी कट ऑफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - सीईएसईने सोमवारी जेईई मुख्य परीक्षा (मेन्स) २०१५ चे निकाल जाहीर केले. यंदा खुल्या प्रवर्गातून अॅडव्हान्स परीक्षेत बसण्यासाठी १०५ गुण मिळवणे आवश्यक ठरणार आहे. गेल्या वर्षी ११५ गुणांचा कट-ऑफ होता. म्हणजेच यंदा तो १० गुणांनी (२.७८%) कमी आहे. ओबीसीसाठी ७०, एससीसाठी ५०, एसटीसाठी ४४ गुणांचा कट ऑफ आहे.

या वर्षी जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या १३ लाख विद्यार्थ्यांपैकी १.५० लाख जणच आयआयटीत प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स देऊ शकतील. दुसरीकडे, जेईई मेन्समधील गुणांचे ६०% आणि बोर्डाच्या
कट ऑफ कमी का झाला?
{ फिजिक्सच्या पेपरचा स्तर कठीण होता, ३६.६७ टक्के प्रश्न इलेक्ट्रो डायनामिक्समधील होते.
{ १५ प्रश्न कठीण होते.
{ सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या हरकती फेटाळल्या.
{ दरवर्षी १५ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. यंदा ही संख्या १३.५६ लाख होती.
संकल्प गौर राज्यात अव्वल
पुणे - जेईई मेन्स परीक्षेत ३६० पैकी ३४५ गुण मिळवून पुण्याचा संकल्प गौर राज्यात अव्वल ठरला. संकल्प म्हणाला,"लक्ष्य नक्की असल्याने अकरावीपासूनच जेईईच्या अभ्यासावर भर दिला. लक्ष विचलित होऊ नये म्हणून गेल्या दोन वर्षांत मोबाइलला हात लावला नाही. फेसबुक, व्हाॅट्सअॅप अशा साइट्सपासूनही दूर राहिलो.