श्रीनगर - दक्षिण काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील दहशतवाद्याचा खात्मा झाला. तो जैश-ए- मोहंमद या दहशतवादी संघटनेच्या कारवायांत सहभागी होता. प्रचंड गोळीबारासह ही चकमक पुलवामा जिल्ह्यात घडली.
चकमकीनंतर दहशतवाद्याच्या मृतदेहाची मागणी करत एका स्थानिक गटाने हिंसक निदर्शने केली. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. निदर्शकांनी पोलिसांच्या दोन मोबाइल बंकरला पेटवून दिले.
त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्याचबरोबर अश्रूच्या नळकांड्याही फोडल्या. दहशतवाद्यांच्या मृतदेहासोबत एके-47 रायफलदेखील जप्त करण्यात आली. चकमकीत जवानदेखील जखमी झाला. मदानी भाई असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याचे नागरिकत्व पाकिस्तानी असल्याचे सूत्रांनी सांगितले.