आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JeM Pak Militant Arrested In Kashmir's Baramulla

अफझल गुरूच्या गटाचा अतिरेकी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या लष्कर आणि पोलिसांच्या चमूने गुरुवारी बारामुल्लातून जैश-ए-मोहंमद या संघटनेचा तसेच स्वत:ला अफझल गुरूच्या चमूतला म्हणणाऱ्या अतिरेक्याला अटक केली. मोहंमद सादिक गुज्जर नामक हा अतिरेकी पाकच्या सियालकोटचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एके-४७ रायफल, १५० काडतुसे, ग्रेनेड आणि बिनतारी यंत्रणा ताब्यात घेतली आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टंगधार भागातील सीमारेषेजवळील लष्करी तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता.

तीन महिन्यांच्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा यंत्रणेने शेवटी त्याला बारामुल्लातून अटक केली. या प्रकरणी त्याला मदत करणाऱ्या जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अापण अफझल गुरूच्या दलातील सदस्य असून सीमारेषेजवळील अथरमुकाममध्ये हल्ला करण्याची योजना होती, असे सादिकने अटकेनंतर सांगितले आहे.