आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jewelry Worth Rs. 70 Thousand Stole In Front Of Shopkeeper In Himachal Video Got Viral

CCTV: तरुणीची चलाखी; अगोदर तोंडात भरले दागिने, नंतर टी-शर्टमध्ये लपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हिमाचल प्रदेशच्या नाहनमध्ये महिलांच्या एका टोळक्याने मोठ्या चलाखीने सराफ्यासमोरच तब्बल 70 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या चोरीचा हातचलाखीचा खेळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या टोळक्यात एक पुरुष, एक महिला आणि एक तरुणी सामील आहेत. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 
 
असे आहे पूर्ण प्रकरण
- सूत्रांनुसार, चोरीची ही घटना 4 ऑगस्टची आहे. व्हिडिओत एका पुरुषासह एक महिला आणि तरुणी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफ्याकडे आल्याचे स्पष्ट दिसते.
- एक महिला सराफाला गप्पांत गुंतवून ठेवते आणि तरुणी मोठ्या चलाखीने दागिने आधी तोंडात टाकते, नंतर टी-शर्टमध्ये लपवते.
- सिरमौर पोलिसांनी या टोळक्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
- या टोळक्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- माहितीनुसार, या टोळक्याने ज्वेलरी शॉपमधून तब्बल 60 ते 70 हजारांचे दागिने चोरी केले आहेत.
- पोलिसांचे त्यांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...