आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंड विधानसभेत अभुतपूर्व गोंधळ; आमदार चढले डेस्कवर, माइक तोडले, खुर्च्या फेकल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंड विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी प्रचंड गदारोळात बहुचर्चित सीएनटी-एनपीटी दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. हे विधयेक मंजूर करण्याच्या वेळी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मोठा गोंधळ झाला. विरोधकांनी सभागृहात विधयेक फाडले, तर काही विरोधी आमदार अध्यक्षांसमोरील टेबलवर चढले. त्यांनी खुर्च्या तोडल्या आणि अध्यक्षांच्या दिशेने फेकल्या. खुर्चीच्या खाली लागलेली चकती अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. ती मार्शलने झेलली अन्यथा ती अध्यक्षांच्या डोक्याला लागली असती. एवढेच नव्हे तर झामुमो आमदार पॉलून सरीन यांनी तर विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने आपला बूट फेकण्याचा प्रयत्न केला. बूट त्यांच्या कानाजवळून जाऊन मागे पडला.
गोंधळ घालणाऱ्यांमध्ये झामुमो, काँग्रेस आणि झाविमो यांच्याव्यतिरिक्त डाव्या पक्षाच्या एखा आमदाराचा समावेश होता, पण अनिल मुर्मू, अमित महतो, शशीभूषण सामड, इरफान अन्सारी प्रचंड आक्रमक होते. उत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित स्टीफन मरांडी यांच्या व्यतिरिक्त महिला आमदार सीता सोरेन, प्रदीप यादव यांनीही टेबलवर चढून गोंधळ घातला. झारखंड विधानसभेच्या इतिहासातील ही सर्वात लज्जास्पद घटना होती. अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. २५ नोव्हेंबरपर्यंत अधिवेशनाचा कालावधी होता.
बातम्या आणखी आहेत...