आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाणू टाकून खाणीची आग नियंत्रित; 40000 कुटुंबे होती धोकादायक स्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडमध्ये सीसीएलच्या भुरकुंडासह अनेक कोळसा खाणींत दहा वर्षांंपासून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. रामगड जिल्ह्याच्या भुरकुंडातील कोळसा खाणीत आग लागल्यामुळे जवळपास ४० हजार लोकसंख्येला स्थलांतर करावे लागले होते.

येथील अनेक खाणींत गेल्या १०० वर्षांत लागलेल्या आगीचा इतिहास पाहता ती विझविण्याची शक्यता नाहीच्या समान होती. मात्र, ज्या जमिनीवर आग लागली होती, तिथे आता पिंपळ शिसमचे हजारो वृक्ष फुलले आहेत.

दिल्ली विद्यापीठातील प्रो. सी.आर. बाबू यांच्या पथकाने प्रायोगिक तत्त्वावर ५० हेक्टर क्षेत्रात परसलेली आग रोखण्याचा यशस्वी प्रयोग केला. २०१० मध्ये रामगडच्या संगम कोलियरीमध्ये भूमिगत कोळसा खाणीत आग लागली होती. यामुळे जमिनीत भेगा पडल्या आणि त्यातून आग धुमसू लागली. दोन वर्षे अशीच स्थिती होती. सीसीएलला येथील वसाहत स्थलांतरित करावी लागली होती. कोळसा मंत्रालयाच्या सांगण्यावरून २०१२ मध्ये इथे आलेले प्रो. बाबू यांच्या पथकाचे शास्त्रज्ञ विवेक चौधरी म्हणाले, कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय नैसर्गिक पद्धतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या प्रयोगाने राज्यातील जवळपास ९० खाणींत लागलेली आग विझविण्याची आशा निर्माण झाली आहे. यासोबत वनाचे क्षेत्रफळही वाढेल.
तीन वर्षांत अशी आग विझविली

भुरकुंडाच्या कोळसा खाण क्षेत्रात तीन वर्षांपूर्वी अशा पद्धतीने जमिनीतून धूर निघत होता.

पहिला टप्पा:
माती आणि शेणात थर्मोफिलिंग बॅक्टेरिया भेगांमध्ये टाण्यात आले. आगीच्या संपर्कात येताच जिवाणू विस्तारू लागले आणि यामुळे जळणाऱ्या कोळशावर आवरण तयार झाले. यामुळे आग ऑक्सिजनचा संपर्क नष्ट झाला. यामुळे ज्वाळा निघणे बंद झाले.

दुसरा टप्पा:
जमिनीवर गवत लावले. गवताच्या मुळाशी फायबरमुळे जमिनीच्या वरच्या पृष्ठभागातून खाली जाणारी हवा रोखली. जमिनीवर आर्द्रतेचे प्रमाण गवतही वाढले. यामुळे जमिनीच्या खाली आग विझल्याचे संकेत मानले गेले.

तिसरा टप्पा :
झारखंडच्या वनामध्ये उगवणारे ४५ प्रकारचे वृक्ष या जमिनीवर लावण्यात आले. सुरुवातीच्या दोन वर्षांत तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले. रोपट्यांच्या मुळात मँग्रोब बॅक्टेरिया टाकण्यात आले. हे जिवाणू नैसर्गिक पद्धतीतून मिळतात. येथे साप, मुंगूस, कोल्ह्याचा संचार आहे.
बातम्या आणखी आहेत...