आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतरासाठी नेमबाज पत्नीवर दबाव आणणारा रकिबुल जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची / नवी दिल्ली- झारखंडमधील नेमबाज तारा शाहदेव हिच्याशी विवाह करणारा आरोपी रंजितसिंह कोहली ऊर्फ रकिबुल हसन याला आई कौशल्याराणीसह मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी अटक केली. रकिबुलला बुधवारी न्यायालयाने तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर विवाहाच्या नावावर फसवणूक केल्याचा तसेच पत्नीला धर्म बदलण्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप आहे.

झारखंडची राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवने आरोप केला की, आरोपी रकिबुल हसनने स्वत:चे नाव रंजितसिंह कोहली असल्याचे सांगून ितच्याशी विवाह केला. नंतर तिच्या लक्षात अाले की, त्याचे नाव रंजित नसून रकिबुल आहे. आरोपीच्या नावे अजामीनपात्र वॉरंट दाखल झाल्यापासून तो फरारच होता. दरम्यानच्या काळात त्याने गृहसचिव तसेच पोलिस महासंचालकांना पत्र लिहून निर्दोष असल्याचा दावा केला होता.

पत्रात त्याने की, तो धर्माने शीख आहोत. त्याचा पुरावा म्हणून स्वत:चे शैक्षणिक प्रमाणपत्र व वाहन परवाना असल्याची मािहती त्याने दिली होती. मी सर्व धर्म समान मानतो. मी बायबल, कुराण, वेदांचा अभ्यास केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्राने राज्याकडे याबाबत अहवाल मागितला होता. झारखंड सरकारने मंगळवारी रात्री उशिरा अहवाल पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
हिंदू तरुणीला फसवल्याने झारखंडमध्ये वाद

अशी झाली अटक
रकिबुलच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथक (एसएसपी) व रांची पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यानुसार काही पोलिस अधिकाऱ्यांना रकिबुल व त्याच्या आईच्या फोटोसह िदल्लीला पाठवण्यात आले. रांची पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी तारा शाहदेवने अनेक टीव्ही चॅनल्सना लाइव्ह फोन केला होता. त्यात ितने रकिबुलचे तीन मोबाइल नंबर िदले होते. चॅनल्सनी त्यावर संपर्क साधला. पैकी एका क्रमांकावर बोलणे झाले. त्यावरून पोलिसांनी रकिबुलचे मोबाइल लोकेशन शोधले व त्या ठिकाणी छापा मारून त्याला व त्याच्या आईला
अटक केली.

घटस्फोट घेणार
दरम्यान, तारा शाहदेवने रांचीमध्ये सांगितले की रंजित ऊर्फ रकिबुलसोबत कोणतेही नाते ठेवण्याचा प्रश्नच नाही. तशी इच्छादेखील नाही. आता मला त्याच्या नावाचीदेखील घृणा वाटते. ज्या व्यक्तीच्या धर्माचा पत्ता नाही. तो कधी िहंदू बनतो तर कधी मुसलमान, अशा व्यक्तीवर माझा आता विश्वास बसणार नाही. जो गेल्या सात वर्षांसून नमाज अदा करतो आहे, तो म्हणतो की मी मुस्लिम नाही. इस्लाम धर्म न स्वीकारताच नमाज अदा करतोय. हे कसे शक्य आहे? त्याच्याशी मला आता कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. घटस्फोटासाठी मी लवकरच न्यायालयात अर्ज देणार आहे.

पंतप्रधानांनी याप्रकरणी लक्ष घालून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत लवकर करण्यास सांगावे, अशी मागणीही तारा शाहदेवने केली आहे.