आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jharkhand New Government Estableshid Claim Hemant Soren

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंडमध्ये नवीन सरकार स्थापनेचा हेमंत सोरेन यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - राष्ट्रपती राजवटीची मुदत संपण्यास नऊ दिवस बाकी असतानाच झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांनी मंगळवारी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला. आपल्या पाठीशी 42 आमदार असून आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सोरेन यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यपाल सईद अहमद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. आमदार अरूप चॅटर्जी, झारखंड जनाधिकार मंचचे आमदार बांधू तिरकी यांच्यासह तीन अपक्ष आमदार बिदेश सिंग, चामरा लिंडा, हरिनरेन राय यांनी सोरेन यांना अगोदर आपले समर्थन जाहीर केले आहे. राज्यात झामुमो, काँग्रेस, राजद यांचा आघाडीत समावेश आहे. गीता कोडा या अपक्ष आमदारांनीही सोरेन यांना पाठिंबा दिला आहे. गीता कोडा या माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी आहेत. झारखंड पार्टीचे आमदार एनॉस एक्का यांनी सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी 15 कलमी कार्यक्रम सोरेन यांच्यासमोर ठेवला आहे. त्याची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पाठिंबा देण्यात येणार आहे. 82 सदस्यीय विधानसभेत सोरेन यांच्या पाठीशी 42 आमदार आहेत.


कशामुळे राष्ट्रपती राजवट?:
जानेवारीपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चा व भाजप यांच्या युतीचे सरकार होते. परंतु 8 जानेवारी रोजी झामुमोने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 18 जानेवारीला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. सध्या विधिमंडळ बरखास्त स्थितीत आहे.