आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकालाच खांबास बांधले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मगनपूर (रामगड) : झारखंडच्या गोला तालुक्यातील कुम्हरदहा माध्यमिक शाळेत संतप्त शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापकालाच खांबाला अडीच तास बांधून ठेवल्याची घटना घडली. शाळेच्या प्रांगणात बुधवारी ग्राम शिक्षण समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू असताना शाळा इमारत निधीबाबत वादावादी झाली. यावर संतप्त शिक्षकांनी मुख्याध्यापकांना बांधून ठेवले. यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. मुख्याध्यापकांनी इमारत निधी काढल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. मात्र, शिक्षकांनीच घोटाळा केला असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

वाद काय?
झारखंड शिक्षण योजनेअंतर्गत 2010-11 मध्ये शाळेच्या इमारत बांधकामासाठी 10 लाख रुपये निधीला मान्यता मिळाली होती. संपूर्ण रक्कम काढली, तरीही तीन वर्षांपासून काम रखडले आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकांचे वेतनही अडवले होते. बुधवारी या विषयावर शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आली होती. यात शिक्षकांनी मुख्याध्यापकाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली.