आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jharkhand Police Encircled 250 Naxal, Two Side Fire

झारखंडात पोलिसांचा 250 नक्षलींना घेराव, दोन्ही बाजूंनी गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातेहार - झारखंड पोलिसांनी लातेहार जिल्ह्यातील कुमंडीहजवळील वनात जवळपास 250 नक्षलवाद्यांना घेरले आहे. शरण या, अन्यथा गोळ्या खा, असा निर्वाणीचा इशारा त्यांना दिला आहे, असे पोलिस महासंचालक राजीवकुमार यांनी सांगितले.


कुमार यांनी बुधवारी सीआरपीएफ तळाला भेट दिल्यानंतर ही माहिती दिली. नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला आहे. पोलिसांकडूनही गोळीबार केला जात आहेत. या कारवाईत दीड हजार पोलिस सहभागी झाले असून नक्षलवाद्यांना चोहोबाजूने घेरले आहे. त्यांची रसद बंद करण्यावरही भर दिला जात आहे, असे कुमार म्हणाले. बुधवारी सकाळी 9 वाजेपासून पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिस या भागात घुसताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच राहिला. या कारवाईत कोब्रा, सीआरपीएफ व झारखंड जग्वार जवान सहभागी होते.


जागोजागी भूसुरुंग पेरले
नक्षलवाद्यांनी संपूर्ण क्षेत्रात भूसुरुंग पेरले आहेत. पोलिस पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा स्फोट होतो. त्यामुळे मार्गात अनेक अडचणी येतात. नक्षल्यांना कुमडीह, बडकाडीह, बोकाखांड व कटिया वनामध्ये तळ तयार केले आहेत.