आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jharkhans Secretariat Latest News In Divya Marathi

PHOTOS: सचिवालय झाले दारूचा अड्डा; कर्मचा-यांना कार्यालयातच लागतात विविध प्रकारचे ब्रँड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडचे 'नेपाळ हाऊस' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या सचिवालय परिसरामध्‍ये राज्‍य सरकारच्‍या विविध विभागाची कार्यालये आहेत. सचिव, विशेष सचिव, संयुक्‍त सचिव, यासह राज्‍य सरकारच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांचा राबता 'नेपाळ हाऊस' मध्‍ये असतो. मात्र या कार्यालयाती कर्मचा-यांचा मात्र ड्रींक केल्‍याशिवाय दिवस सुरू होत नाही. अधिका-याला न जुमानता कर्मचारी भर‍ दिवसा कार्यालीन वेळेमध्‍ये दारू प्‍यायल्‍याचे आढळून आले आहे. विविध विभागाच्‍या फायलीमध्‍ये आनेक प्रकारच्‍या दारूच्‍या बाटल्‍या आढळून आल्‍या आहेत. कळस म्‍हणजे सचिवालयाच्‍या बाथरूममध्‍ये बीयर आणि दारूचे विविध बँड आढळून आले आहेत. सचिवालयाच्‍या प्रत्‍येक मजल्‍यावर आणि प्रत्‍येक विभागात एक तरी दारूची बाटली पाहायला मिळत आहे. या बाबत वरिष्‍ठ अधिकारी मात्र मुग गीळून गप्प आहेत. या कर्मचा-यांवर कसल्‍याही प्रकारची कारवाई करण्‍यात आलेली नाही.
गेटवर उपलब्‍ध होते दारू-
सचिवालयाच्‍या गेटवर विविध प्रकारचे ब्रँड कर्मचा-यांना पुरवले जात असल्‍याचे डीबी स्‍टारच्‍या तपासामध्‍ये स्‍पष्‍ट झाले आहे. प्रत्‍येक विभागामध्‍ये फाइलमध्‍ये विविध प्रकारचे ब्रँड आढळून आले आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा कार्यालयात आढळून आलेल्‍या विविध ब्रँडची छायाचित्रे...