आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 लाखांचे पॅकेज सोडून तो जगतोय आपले स्वप्न, लंडन आणि सिंगापूरमध्ये झाले नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिश्नू दासगुप्ता मोकळ्या वेळेत)

जमशेदपुर - आवड आणि जिद्द माणसाला काय करायला लावेल हे कोणीच सांगु शकत नाही. याच आवडीसाठी येथील जिश्नू शांतनू दासगुप्ता याने त्याच्या लाखांच पॅकेज असलेल्या नोकरीस लाथ मारून आपल्या आवडी निवडी जगण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सएलआरआयचे माजी विद्यार्थी जिश्नू दासगुप्ता यांनी आपल्या संगीत (म्यूजिक) च्या आवडीसाठी इंडियन टोबॅको कंपनी (आयटीसी) ची 20 लाख (वर्षाला) रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडून दिली. जुश्नूसध्या बेंगलूरू येथील म्यूझिक बँड स्वरात्मासाठी गिटारिस्ट म्हणून काम करतात.
जुश्नू म्हणाला, भारतीय समाजात अशा करिअरला कोणीच स्वीकारत नाही. नोकरी सोडल्यानंतर जिश्नू दासगुप्ता यांनी ब्रिटीश काऊंसिलकडून लंडन आणि सिंगापूरमध्येही गिटारिस्टम्हणून सादरीकरण केले आहे.
कुटुंबामध्ये होते संगीताचे वातावरण
इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर एक्सएलआरआयमधून जिश्नूने बिझनेस मॅनेजमेंटचे (2006 बॅच) शिक्षण पुर्ण केले. प्रत्येक पित्याला वाटते त्याप्रमाणे शांतनु दासगुप्तांनाही आपल्या मुलाने कॉर्पोरेट जगतात नाव कमवावे असे वाटत होते. शांतनु दासगुप्ता स्वतः केरळमध्ये एक अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. मात्र नियतीला काहीतरी वेगळेच दाखवायचे होते. बंगाली कुटुंबातील असल्याने लहानपणापासूनच जिश्नूच्या कानावर संगीताचे स्वर पडत होते. जिश्नूच्या शरीरात संगीताचे बीज लहानपणीच रुजले गेले आणि या बिजाचे शिक्षणासोबत रोपटे झाले. जिन्शूने जेव्हा एक्सएलआरआयमध्ये कॉलेजचा बँड बोधी-ट्रीमध्ये सादरीकरणाची संधी मिळाली तेव्हा त्यांना आपल्या आवडीविषयी प्रकर्षाने जाणीव झाली. मुळचे कोलकाता येथील राहणार्‍या जिश्नूने एनआयटी त्रिची येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर जिश्नूने एमबीए करण्यासाठी जमशेदपूरच्या एक्सएलआरआयमध्ये प्रवेश घेतला. आयटीसीमध्ये ब्रॅंड मॅनेजर असताना जिश्नूने आपल्या पदाचा राजीनामा देऊन संगीताची वाट धरली.

नोकरी आणि संगीत यादरम्यान संतुलन ठेवणे होते कठीण
जिश्नू म्हणतो की, एक्सएलआरआयमधून पास झाल्यानंतर माझी प्लेसमेंट आयटीसीमध्ये झाली. यासाठी मला बेंगलूरू ठिकाण देण्यात आले. नोकरीसोबतच माझ्या संगीताच्या आवडीला मी विकेंडला वेळ द्यायचो. त्यावेळी मला बेंगलूरू म्यूझिक बँड स्वरात्माशी जोडून घेण्याची संधी मिळाली. माझ्या सादरीकरणामुळे मला ब्रिटीश काऊंसिलतर्फे लंडन आणि सिंगापूरला जाण्यास मिळाले. तोपर्यंत माझे लग्न झाले होते. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे माझे संगीत यादरम्यान संतुलन ठेवणे मला अवघड वाटायला लागले. त्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी या निर्णयाबद्दल वडीलांना सांगितले तेव्हा ते नाराज झाले. मात्र मी माझ्या वडलांना समजावले. मी जे काही करेन ते चांगलेच करेन असा विश्वास दिला. आज माझ्याकडे भलेही पैसे कमी असतील, मात्र मी समाधानी आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, जुश्नूचे संगीतप्रेम...