आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री नितीशकुमार मित्रपक्षांच्या दबावाखाली आलेय- मांझी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मित्रपक्षांच्या दबावाखाली आले आहेत. त्यांनी या पद्धतीने काम करण्याऐवजी पद सोडलेले अधिक योग्य राहील, असा सल्ला हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे (सेक्युलर) नेते जितनराम मांझी यांनी दिला आहे.

नितीशकुमारांना स्वतंत्रपणे निर्णय घेणे शक्य नाही. मित्रपक्षांच्या दबावाखाली ते आहेत, अशा बातम्या माध्यमांतून आल्या. त्यानंतर जितनराम यांनी सल्ला दिला. नितीश स्वतंत्रपणे काम करू शकत नसल्याचे आपल्यालाही जाणवते, असे ते म्हणाले. राजदचा त्यांच्यावर दबाव असल्याचे लालूप्रसाद यादवांच्या नावाचा उल्लेख न करता मांझींनी सुचवले.

इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या तपासणीसाठी लालू अचानक आल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राज्यातील अधिकारीही राजदच्या दबावामुळे खुश नसल्याचे ते म्हणाले. ३५ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांनी केंद्रीय पदांवर डेप्युटेशनसाठी लिखित अर्ज केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसंबंधी ठोस निर्णय घेणे नितीश यांना शक्य होत नाही. या दबावामुळे सरकारचे नेतृत्व करणे क्लिष्ट झाले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिकच बिघडत असल्याचा उल्लेखही मांझींनी केला. राज्यात सध्या वाद-विवादातच वेळ जात असल्याने कोणतीही विकासकामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे याकामांसाठी विविध विभागांत असलेला निधी शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...