आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jitan Ram Manjhi Defends Himself On Controversy Over Age, Assets

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपत्ती व वयाची माहिती खरी : जीतन मांझी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा -बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी अखेर मालमत्ता व वयाच्या वादावर मौन सोडले आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेले विवरण पूर्णपणे खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये रविवारी भूपेंद्र नारायण मंडलच्या जयंती सोहळ्यासाठी आलेले मांझी म्हणाले की, कुठेही कसलीही चूक नाही. माझी जन्मतारीख ६ ऑक्टोबर १९४४ हीच आहे, त्यानुसार माझे वय स्पष्ट आहे. माहितीतील विसंगतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर काहीही उत्तर न देता ते कारमध्ये बसून निघून गेले.

जदयूने मागितले स्पष्टीकरण : मांझी यांच्या मालमत्तेच्या विवरणावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी स्पष्ट माहिती द्यावी असे जदयूने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते नीरजकुमार यांनी रविवारी सांगितले की, मालमत्तेच्या विवरणाची कोणती कागदपत्रे अचूक आहेत हे मुख्यमंत्रीच सांगू शकतात.