आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendrasing Tomar LLB Degree Original Says Principal

जितेंद्र तोमर यांची LLB ची पदवी खरी, प्राचार्य-कुलगुरुंचे मात्र परस्परविरोधी दावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंगेर भागलपूर - बनावटगुणपत्रिका प्रकरणात वादात सापडलेले आम आदमी पार्टीचे नेते माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना शुक्रवारी मुंगेर येथे थोडा दिलासा मिळाला. तोमर यांनी मुंगेरच्या विश्वनाथ विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी घेतली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याला दुजोरा दिला.परंतु विद्यापीठाचे कुलगुरु रमाकांत दुबे यांनी मात्र पदवी बनावटच असल्याचा दावा केला आहे.

महाविद्यालयातील रजिस्टर नोंदीतून तोमर यांनी १९९४ ते १९९५ मध्ये त्यांचे रोल नंबर १०१३६ होते. तपासात स्पष्ट झाले की तोमर यांनी १९९४-९५ १९९५-९६ मध्ये परीक्षा दिली होती. पण १९९७-९७ मध्ये परीक्षा दिली नव्हती. कारण ते नापास झाले होते. नंतर १९९८-९९ मध्ये त्यांनी परीक्षा दिली पदवी मिळवली. प्राचार्य आर. के. मिश्रा यांच्या खोलीत त्यांच्या उपस्थितीत तोमर यांनी कॉलेजमध्ये नोंदणीसाठी जो पत्ता लिहिला होता तो मात्र खोटा निघाला आहे. त्यानंतर पोलिस तोमर यांना तिलकमांझी भागलपूर विद्यापीठात घेऊन गेले. तेथे तोमर एकाही शिक्षकाला ओळखू शकले नाहीत. विद्यापीठात राजकीय संघटनांच्या विद्यार्थी नेत्यांनी तोमर यांच्यावर अंडे - टोमॅटो शाई फेकली. फैजाबादमध्ये केएस साकेत पीजी महाविद्यालय आरएमएल अवध विद्यापीठात त्यांचे दावे निराधार निघाले होते. तेथे ते क्लासरूम, लॅब वॉशरूम इतर खाणाखुणा ते सांगू शकले नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या सचिवांवर कारवाई होण्याची शक्यता : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मुख्य सचिव राजेंद्रकुमार यांच्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारने अादेश दिल्यानंतरही त्यांनी गृह विभागाचे सचिव म्हणून काम करणे बंद केले नाही. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या आदेशचा अवमान असून हा शिस्तभंग आहे.
केंद्र सरकार आप सरकारमध्ये सुरू असलेल्या तणावानंतर गृह विभागाचे सचिव धरमपाल यांची बदली करून केजरीवाल यांनी कुमार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवली होती. परंतु उपराज्यपाल, गृहमंत्रालयाने बदलीचा आदेश खारीज केला होता.