जम्मू(अंकुर सेठी) - अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या वाहनावर करण्यात आलेल्या हल्ल्यात दोन जवान शहिद झाले आहेत. एएसआय ओमकार सिंह आणि कॅस्टेबल तिलकराज असे शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत. हा हल्ला दुपारच्या सुमारास झाल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिका-यांनी दिली आहे.
पेट्रोलिंगसाठी जात असताना सीआरपीएफच्या या वाहनावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला यामध्ये दोन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिका-यांनी दिली आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आल्याची माहिती अधिका-यांतर्फे देण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा हल्ल्याचे फोटो...