आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत \'हराम\' असल्याचे सांगणारे मुफ्तीच संगीताच्या प्रेमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मिरमधील मोठ्या मुफ्ती साहेबांनी संगीतसंदर्भात दुटप्पी भूमिका घेतल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. मोठे मुफ्ती साहेब बशीर-उद-दीन अहमद श्रीनगरमधील सुप्रसिद्ध दल सरोवराजवळ संगीत ऐकताना दिसून आले आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र द डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील मुफ्ती यांनी रेडिओ काश्मिरच्या वतीने उर्दू शायर अकबर जयपूरी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यात म्युझिकल इव्हनिंगचा आनंद घेताना ते दिसले होते.

मोठ्या मुफ्ती साहेबांनी काश्मिरमधील मुलींचा रॉक बॅंड प्रगाशला बंद पाडले आहे. मुफ्ती यांच्या आदेशानंतर मुलींनी दडपणाखाली येऊन बॅंड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मुफ्ती यांनी सांगितले होते, की इस्लामनुसार संगीत ऐकणे गैर-इस्लामी आणि हराम आहे.

पुढील छायाचित्रांमध्ये बघा रॉक बॅंड प्रगाश आणि मुफ्ती साहेब...