आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: LoC वर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा, PAKची बससेवा बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/नवी दिल्ली - जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये सोमवारी लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. वृत्त लिहिपर्यंत एन्काउंटर सुरूच होते. सूत्रांनुसार, 3 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला कडक शब्दांत सरकारने सुनावले असून पूंछ-रावळकोटची बससेवा एका आठवाड्यासाठी बंद करण्यात आली आहे.
 
असे आहे प्रकरण...
- वृत्तसंस्थेनुसार, नौगाम परिसरात असलेल्या एलओसीवर सोमवारी सकाळी गस्त घालणाऱ्या लष्कराच्या जवानांनी काही दहशतवादी घुसखोरी करताना आढळून आले.
- जवानांनी त्यांना हटकल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. प्रत्युत्तरात सैन्यानेही गोळीबार केला. वृत्त लिहीपर्यंत एन्काउंटर सुरू होते आणि तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली.
- लष्कराने सांगितले की, दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पाकिस्तानातून भारतीय हद्दीत दाखल होत होते. परंतु, मागच्या काही महिन्यांपासून भारतीय लष्कराने या परिसरात गस्त वाढवलेली आहे. यामुळेच दहशतवाद्यांना घुसखोरी करता आलेली नाही.
 
 बससेवा रोखली
 - वृत्तसंस्था एएनआयनुसार, भारत सरकारने सोमवारी याप्रकरणी कडक भूमिका घेत पूछंहून पाकिस्तानच्या रावळकोटला जाणाऱ्या बससेवेला एका आठवड्यापर्यंत बंद केले आहे. हे पाऊल उचलण्यामागचे कोणतेही कारण दिलेले नाही.
 - एका माहितीनुसार, सरकार सात दिवसांनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन बससेवा सुरू ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...