आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JK OMC KA Indian Army Returns Pakistani Boy Who Wandered Into Jammu And Kashmi

चुकून भारताच्‍या सीमेत घुसला पाकिस्तानी समीर, कपडे, मिठाई देऊन पाठवले माघारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जवानांसोबत अकरा वर्षीय भारतीय जवान. - Divya Marathi
भारतीय जवानांसोबत अकरा वर्षीय भारतीय जवान.
(फोटो:भारतीय जवानांसोबत अकरा वर्षीय भारतीय जवान.)
श्रीनगर – पाक व्‍याप्‍त काश्‍मीरमधून चुकून भारताच्‍या सीमेत प्रवेश केलेल्‍या एका 11 वर्षांच्‍या मुलाला भारतीय सीमा सुरक्षा जवानांनी केवळ सुखरुप घरी पोहोचवलेच नाही; तर त्‍याला नवीन कपडे, मिठाई देऊन मानसिक आधारही दिला. समीर कयाणी असे त्‍या मुलाचे नाव आहे.

याबाबत सेनेचे डिफेंस प्रवक्ता एन. एन. जोशी यांनी सांगितले, '' भारतीय सैनिकांना तंगधार सेक्टरमध्‍ये दोन दिवसांपूर्वी 11 वर्षीय समीर आढळून आला. तो घाबरलेला होता. त्‍याला ताब्‍यात घेऊन मानसिक आधार दिला. शिवाय या बाबत पाकिस्‍तानला माहिती दिली आणि तो सुखरुप असल्‍याचे सांगितले. शिवाय त्‍याच्‍या सोबत फ्लॅग मीटिंग करण्‍याची विनंती केली. तसे केल्‍यास तो लवकरात लवकर आपल्‍या कुटुंबाजवळ पोहोचेल, हेही सांगितले. शनिवारी तंगधारच्‍या तीतवालममध्‍ये ही मीटिंग झाली. भारतीय सैन्‍याने मिठाई आणि नवीन कपडे देऊन समीर याची पुन्‍हा पाकिस्‍तानकडे रवानगी केली’’, अशी माहिती जोशी यांनी दिली.