आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JK PDP MLA Brandishes AK 47 Claims He Had It Only For Self Defence

काँग्रेस उमेदवाराने मुलीला म्हटले लायबलिटी, एके 47 घेऊन पीडीपी आमदारांचा प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीर निवडणूकीच्या संबंधाने दोन नेते वादात अडकले आहेत. गांदरबल येथील काँग्रेस उमेदवार यूसुफ भट्ट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात मुलीचे नाव 'लायबलिटी' कॉलममध्ये टाकले आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या छदूडा विधानसभा मतदारसंघात पीडीपी आमदार जावेद मुस्तफा मीर एका छायाचित्रामुळे वादात अडकले आहेत. ते त्यांच्या फेसबुक पेजवर बुलेटप्रूफ जॅकेटसह हातात बंदूक घेऊन उभे असल्याचे दिसते. त्यांनी त्याची अशी अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत. त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे आहे, की आमदार महोदय जेव्हा येतात तेव्हा अशा पद्धतीने शस्त्रांचे प्रदर्शन करतात.
त्यांच्या एका समर्थकाने म्हटले आहे, 'मी त्यांना खाकी टोपी आणि जॅकेट परिधान करुन हातात बंदूक घेतलेले अनेकदा पाहिले आहे. मला वाटते, की त्यांना हातात बंदूक घेऊन मिरवण्याची हौस आहे.' तर, एका फेसबुक युजरने 'द डॉन एमएलए' अशी कॉमेंट केली आहे.
अनेक फेसबुक युजर्सनी आमदार म्हणून त्यांनी चांगले काम केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पोलिसांसारख्या त्यांच्या वागणूकीवर आक्षेप नोंदवला आहे.
आमदार जावेद मुस्तफा मीर यांचे म्हणणे आहे, की स्वतःच्या सुरक्षेसाठी मी बंदूक सोबत ठेवतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मीर यांची आणखी छायाचित्र