आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • J&K Police Registered Fir In Connection With Video Showing Man Tied To An Army Vehicle

J&K: 'पत्थरबाजा'ला जीपला बांधल्याने आर्मीविरोधात गुन्हा दाखल, अब्दुल्लांनी केले होते ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केल होता. त्यात एका काश्मीरी व्यक्तीला आर्मी जीपच्या बोनेटला बांधलेले होते. - Divya Marathi
हा फोटो माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केल होता. त्यात एका काश्मीरी व्यक्तीला आर्मी जीपच्या बोनेटला बांधलेले होते.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एका 'पत्थरबाजा'ला गाडीला बांधल्या प्रकरणी पोलिसांनी लष्कराविरोधात एफआयआर दाखल केला आहे. विशेष म्हणजे, हा फोटो माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केल होता. त्यात एका काश्मीरी व्यक्तीला आर्मी जीपच्या बोनेटला बांधलेले होते. पोलिसांनी खोऱ्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या जवानांना काही दिवस त्यांच्या मुळगावी न जाण्याचा सल्ला दिला आहे. 
 
- वृत्तसंस्थेनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे, की राज्यातील हिंसाचार पाहाता जवानांनी पुढील काही महिने घरी जाऊ नये. 
- अॅडव्हायजरीत म्हटल्यानुसार, खोऱ्यात दहशतवादी, देशविरोधी, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे लोक पोलिस फोर्सला लक्ष्य करत आहे. 
- त्यात म्हटले आहे, 'दक्षिण काश्मीरमधील पोलिसांनी सतर्क राहाण्याची गरज आहे. ते घरी जात असतील तर त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. शक्य असेल तर त्यांनी होमटाऊनला जाणे टाळावे.'
 
उमर अब्दुल्लांनी केले होते ट्विट 
- माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी फोटो ट्विट करत त्यासोबत लिहिले होते, 'या तरुणाला जीपसमोर बांधण्यात आले आहे, जेणेकरुन आर्मीवर कोणी दगडफेक करु नये. हे चित्र भयावह आहे.' या घटनेचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाला होता. 
- 9 एप्रिल रोजी श्रीनगरमध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी काही मतदान केंद्रावर हिंसाचार उसळला होता. आर्मीचा ताफा जात असताना त्यांच्यावर कोणी दगडफेक करु नये म्हणून त्यांनी एका युवकाला जीपच्या बोनेटला बांधले होते. ही जीप सर्वात पुढे होती. 
- हिंसाचाराच्या घटनेमुळे 38 मतदान केंद्रांवर 13 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्यात आले होते. 
- आर्मीने तरुणाला जीपच्या बोनेटला बांधून  दगडफेक आणि हिंसाचारापासून वाचण्यासाठी त्याचा ढालीसारखा उपयोग केल्याचे म्हटले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...