आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक भास्कर - जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये अखिल भारतीय हिंदी निबंध स्पर्धेचे निकाल जाहिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - सध्याच्या जगात हिंदी भाषेचे अस्तित्व आणि विकासासाठी दैनिक भास्करने अखिल भारतीय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये देशभरातून हजारोंच्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला. लेखनाची आवड असलेल्या लोकांसाठीतर ही पर्वणीच होती. जयपूरच्या लिटरेचर फेस्टीव्हलच्या सहयोगाने आयोजिक करण्यात आली ही स्पर्धा साहित्य प्रेमींचे खास आकर्षण होती. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड तिन टप्प्यांमध्ये करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दैनिक भास्करच्या संपादकीय टीमने आलेल्या एन्ट्रीजची निवड केली. दुसऱ्या टप्प्यात तीन सदस्यांच्या ज्यूरींनी एन्ट्रीजची तपासणी केली. या ज्यूरींच्या पॅनलमध्ये राजस्थान विद्यापीठातून निवृत्त प्राध्यापक डॉ. सरस्वती माथूर, प्रा. वीरबाला भावसार, आणि महिला साहित्य संस्थान ‘स्पंदन’च्या अध्यक्षा नीलिमा टिक्कू यांचा समावेश होता. या स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात दैनिक भास्करच्या संपादकीय विभागातील वरिष्ठ सदस्यांच्या समितीने या पॅनलच्या शॉर्टलिस्ट एन्ट्रीजमधून तीन विजेत्यांची निवड केली.
विशेष म्हणजे या स्पर्धेचा विषय "हिंदी भाषेत होत असलेल्या इतर भाषेतील शब्दांचा वापर, हिंदीसाठी वरदान की शाप" असा होता. स्पर्धकाला या विषयावर 1000 शब्दांमध्ये निबंध लिहून पाठवायचा होता. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेतील तीन विजेत्यांना 21 ते 25 जानेवारीला जयपूरच्या डिग्गी पॅलेसमध्ये होणाऱ्या जयपुर लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी ट्रीप स्पान्सर करण्यात आली आहे. इतर विजेत्यांना सांत्वना पुरस्काराच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. दैनिक भास्कर या जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये ‘भास्कर भाषा सीरीज’चेही आयोजन करणार आहे.
या स्पर्धेत हरियाणाचे नवरत्न पांडे, इंदूरच्या डॉ.सरोज बिलोरे आणि भोपाळच्या अंकिता त्रिपाठी हे स्पर्धक विजयी झाले आहेत. हे तिघे दैनिक भास्करकडून जेएलएफमध्ये भाग घेणार आहेत.

सांत्वना पुरस्काराचे मानकरी
भीलवाडाचे अर्पित कचोलिया, भोपालच्या पूजा कुशवाह, कुरुक्षेत्रचे डॉ. रविश कुमार चौहान, उदयपूरच्या दीपिका कुमारी सेवक, पानीपतच्या एकता रोहिल्ला, अजमेरचे मनीष कुमार चौहान आणि उज्जैनचे शुभम शर्मा.