आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दिवसांपासून 90 डब्‍यांची ट्रेन गायब; 9 कोटी रुपयांचा माल घेऊन जात होती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

जोधपूर - राजस्‍तानातातील जोधपूर येथून 27 जुलैला अहमदाबादकडे निघालेली एक मालगाडी आपल्‍या निर्धारित ठिकाणी पोहोचलीच नाही. विशेष म्‍हणजे ती कोण चालवत होते, आता कुठे आहे आणि तिचे काय झाले, याचा तब्‍बल 17 दिवसानंतरही काहीच तपास लागला नाही. दरम्‍यान, गाडीच्‍या ऑनलाइन स्‍टेटसमधूनही दिशाभूल केली गेली आहे. या मालगाडीतून 90 कंटेनरची वाहतूक केली जात होती आणि प्रत्‍येक कंटेनरमध्‍ये 10-10 लाखांचा म्‍हणजे एकूण 9 कोटी रुपयांचा माल होता. त्‍यामुळे गूढ वाढले आहे.
 
जोधपूर येथील एक्सपोर्टर रंजन कंसारा यांनी कंटेरनसगट त्‍यातील माल पोहोचवण्‍यासाठी या ट्रेनचे 14 जुलैला बुकिंग केले होते. ठरल्‍या प्रमाणे ही ट्रेन माल घेऊन 27 जुलैला रवानाही झाली. 30 जुलै तिच्‍या पोहोचण्‍याची तारिख होती. पण, ठरलेल्‍या दिवशी आणि वेळी ती  अहमदाबाद पोहोचलीच नाही. त्‍यामुळे रंजन कंसारा यांनी  डेपोचे सीएमडी यांच्‍याकडे लेखी तक्रार केली. त्‍यावर तत्‍काळ ट्रेन शोधण्‍याचे काम सुरू झाले. या बाबत  कॉनकोरचे टर्मिनल मॅनेजर पारस गोयल यांनी सांगितले, मुसळधार पावसामुळे ट्रेन कुठे तरी अडकली असेल. तिच्‍या शोधासाठी आम्‍ही एक कर्मचारी पाठवला आहे.  
 
पुढील स्‍लाइड्वर वाचा, ऑनलाइन स्‍टेटसमधूनही दिशाभूल....