आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखादा तृतीयपंथी बनताना असे असतात विधी, पहिल्यांदाच पाहा ही गूढ परंपरा- VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - शनिवारी जोधपूरच्या तृतीयपंथी समाजात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या समाजात त्या दिवशी एका नव्या सदस्याचा समावेश झाला. मथानिया परिसरातील 18 वर्षीय (तरुण) तृतीयपंथीयाला त्याच्या आईवडिलांनी गुरू कांताबुआला सोपवले. यानंतर तृतीयपंथी समाजात आनंदाच्या वातावरणात नव्या सदस्याला त्यांच्या रीतिरिवाजानुसार अमरसौभाग्याचे प्रतीक लुगडे परिधान करायला लावून समाजात प्रवेश देण्यात आला. यानंतर तृतीयपंथीयांनी जोरदार नृत्य केले.
 
असे केले समाजात सामील...
- जोधपूर जिल्ह्याच्या मथानिया परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहणाऱ्या अंकितला त्याच्या आईवडीलांनी तृतीयपंथीयांची गादीपती कांता बुआला सोपवले.
- त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणणे होते की, तो आता 18 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याच्या संमतीनेच त्याला येथे सोडत आहोत.
- यानंतर तृतीयपंथीयांनी आनंदोत्सव साजरा करून नव्या सदस्याचे स्वागत केले. यानंतर त्याला तृतीयपंथीय समाजात सामील करण्याचे विधी करण्यात आले. कांता बुआने सांगितले की, तृतीयपंथीयाला अमर सौभाग्याचे प्रतीक लुगडे घालायला दिले जाते. यासोबतच गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. हातात सौभाग्याचे प्रतीक बांगड्या घालायला देऊन यासोबतच अनेक सौभाग्यचिन्हे घातली जातात.
- समाजात सामील होण्यासाठी एका तृतीयपंथीयाला दुसऱ्याला गुरू बनवावे लागते. येथे कांता बुआच्या सांगण्यावरून तृतीयपंथी पायलला नव्या सदस्याचा गुरू बनवण्यात आले. यानंतर त्याच्या गुरू पायलनेच अंकितला नवे नाव दिले- रेखा.
- आपल्या समाजात नव्या सदस्याचा समावेश झाल्याने इतर तृतीयपंथीयांनी ढोलकीच्या तालावर लोकगीतांसह जोरदार डान्स करून त्याचे स्वागत केले.
 
सर्व फोटो: एल. देव जांगिड
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...