आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर- आसाराम बापूंचा सेवक शिवाच्या मोबाईलमध्ये आसाराम बापूंची एक व्हिडिओ क्लिप सापडली आहे. त्यात ते एका मुलीच्या शरीरावरुन हात फिरवत असल्याचे दिसत आहे. अशा आणखी क्लिप्स सापडण्याची पोलिसांना शक्यता आहे. आसाराम बापूंवर आरोप करणा-या पीडित मुलीला दोन वेळा जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आता समोर येत आहे. दुसरीकडे आसाराम बापूंविरुद्ध आता तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. जोधपूर पोलिसांना अनेक आसाराम पीडित तरुणींनी तक्रारी दिल्या असून तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीवर 15 ऑगस्टच्या रात्री जोधपूरच्या मणाई येथील फार्महाऊसवर आसाराम बापूंच्या खोलीत पाठविण्यात आले होते. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळीही तिला आसाराम बापूंनी तिला खोलीत बोलाविले होते. परंतु, ती तयार झाली नाही. तिने नकार दिला. त्यानंतर आसाराम बापू सहका-यांसह तिथून निघून गेले. फार्म हाऊसच्या मालकानेही पोलिस अधिका-यांसमोर हे मान्य केले होते. मुलीने कदाचित आसाराम बापूंचे इरादे जाणून घेतले होते. त्यामुळेच तिने दुस-यांदा खोलीत जाण्याचा नकार दिला होता.
पीडित मुलीने पोलिसांना सांगितले, की जोधपूरमध्ये तिला आणि तिच्या कुटुंबियांच्या ओळखीचा कोणीही नव्हता. त्यामुळे त्याच वेळेस विरोध केला असता तर आसाराम बापूंच्या इशा-यावर तिच्या संपूर्ण कुटुंबाला सपविण्यात आले असते, अशी भीती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.