आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jodhpur Schoolgirls With Wine Bottles In School\'s Farewell Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनीचे वर्गातच ‘झूम बराबर झूम’; सामू‍हिक दारूची पार्टी केली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्गातील गोंधळ ऐकून तेथून जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आला. - Divya Marathi
वर्गातील गोंधळ ऐकून तेथून जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आला.
जोधपूर - येथील पाल रस्‍त्‍यावर असलेल्‍या डीपीएस शाळेत नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अध्ययनाबरोबरच मद्य पार्टीही करून टाकली. एक विद्यार्थिनी नशेत झुलत नाचू लागली त्यावेळी हा प्रकार उजेडात आला. एका विद्यार्थ्याने कोल्ड्रिंकमध्ये दारू मिसळून आणली होती. त्याने एका बाटलीतून हे मद्य दुसऱ्या वर्गात पोहोचवले. एक बाटली आपल्याच वर्गात ठेवली आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. वर्ग संपताच विद्यार्थिनी उठली आणि नाचायला लागली. दुसरे विद्यार्थीही त्यावर नाचू लागले. वर्गातील गोंधळ ऐकून तेथून जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांना मद्यधुंद अवस्थेतील मुले नाचताना दिसू लागली. त्यांनी तत्काळ वर्गशिक्षिकांना बोलावले. त्याचबरोबर त्याची माहिती व्यवस्थापनाला देण्यात आली. व्यवस्थापनाचे प्रतिनिधी दाखल झाल्याचे भानही मुलांना नव्हते.
हॉस्टेलच्या वॉर्डनने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मद्यपान न केलेल्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आई-वडीलांनी याबद्दल माहिती दिली. व्यवस्थापनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...