आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भूमी\'च्या शुटिंग दरम्यान संजूबाबाच्या बॉडीगार्ड्सची पत्रकारांना मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकारांशी बोलताना संजय दत्त. - Divya Marathi
पत्रकारांशी बोलताना संजय दत्त.
आग्रा  - भूमी या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या संजय दत्तच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. आग्रा  येथे त्याच्या बॉडीगार्ड्सनी स्थानिक पत्रकारांना मारहाण केल्याने त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही मारहाण झाली त्यावेळी संजय दत्तही त्याठिकाणी होता, पण तो निघून गेला. मात्र काही वेळाने त्याने पत्रकारांची माफी मागितल्याची माहिती मिळत आहे. 

आग्रा येथे काही दिवसांपासून संजय दत्तच्याभूमि चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. ताज महलापासून काही अंतरावर चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. त्यावेळी ताजच्या व्हीव्हीआयपी रोडवर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. याचे कव्हरेज करण्यासाठी काही स्थानिक पत्रकार त्याठिकाणी पोहोचले. त्यांना संजय दत्तच्या बॉडीगार्ड्सने मारहाण केली. संजय दत्तनेच त्यांना तसा इशारा केल्याची चर्चा याठिकाणी होती. ताज गंज पोलिस ठाण्यात या प्रकरणी संजय दत्त आणि त्याच्या बॉडीगार्ड्सच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 

या मारहाणीत पाच पत्रकार गंभीररित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या पत्रकारांना गार्ड्ससह पोलिसांनीही मारहाण केल्याचे समोर येत आहे.  या चित्रपटाद्वारे संजय दत्त पुनरागमन करत असून आदिती राव हैदरी आणि शेखर सुमन यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...